सार्वजनिक क्षेत्र दूरसंचार कंपनी BSNL आपल्या ग्राहकांना 4G सेवा उपलब्ध करुन देऊ शकली नाही, तर दुसरीकडे अन्य कंपन्यांनी आपल्या 4G सेवेचा ट्रायलसुद्धा पुर्ण केला आहे आणि काही कंपन्यांनी तर आपली 4G सेवा अनेक ठिकाणी सुरु केली आहे. BSNL चे म्हणणे आहे की, स्पेक्ट्रम न मिळाल्यामुळे ती आतापर्यंत आपल्या ग्राहकांना 4G सेवा उपलब्ध करुन देऊ शकली नाही. ह्याची भरपाई म्हणून आता BSNL देशभरात ३ वर्षाच्या आता ४० हजार वायफाय हॉटस्पॉट लावण्याच्या तयारीत आहे.
BSNL चे चेअरमन आणि प्रबंध निदेशक अनुपम श्रीवास्तवने सांगितले आहे की, सध्यातरी आम्ही 4G सेवा प्रदाता नाही आणि ना आमच्याकडे ही सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले स्पेक्ट्रम आहेत. मात्र आम्ही येणा-या ह्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी पुढील ३ वर्षांच्या आत देशभरात जवळपास ४० हजार ठिकाणांवर वायफाय हॉट स्पॉट लावण्याच्या योजनेवर काम सुरु केले आहे. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की,BSNL च्या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशाच्या वेगवेगळ्या भागात ५०० वायफाय हॉटस्पॉट लावले गेले आहेत. वित्तीय वर्षाच्या शेवटपर्यंत ह्या वायफाय हॉटस्पॉटची संख्या वाढवून २,५०० केली जाणार आहे. श्रीवास्तव यांनी असेही सांगितले की, मोबाईल सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी BSNL आपल्या ५,५०० करोड योजनेच्या अंतर्गत देशात २५,००० टॉवर लावणार आहे.
तसेच कॉल-ड्रॉपच्या समस्येवरील प्रश्नावर त्यांनी सांगितले की, “मागीली काही दिवसांपासून लोकांच्या मनात असा विचार घोंघावत होता, मोबाईल टॉवरमधून निघणारी विकिरण आरोग्यावर घातक परिणाम करतात. त्याचाच परिमाण म्हणून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधून असे टॉवर हटविण्यात आले, ज्यामुळे कॉल ड्रॉपची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली. ”