BSNL 4G Plan: स्वस्त प्लॅनमध्ये दीर्घकाळ वैधतेसह मिळेल तब्बल 120GB डेटा, बघा किंमत आणि सर्व बेनिफिट्स। Tech News

Updated on 13-Feb-2024
HIGHLIGHTS

BSNL च्या 288 रुपयांमध्ये 60 दिवसांच्या वैधतेसह येतो.

हा BSNL प्लॅन तुम्हाला 4G डेटा ऑफर करतो.

या प्लॅनसह BSNL ग्राहकाच्या नंबरवर तब्बल 120GB डेटा मिळणार आहे.

देशातील एकमेव भारतीय सरकारी दूरसंचार कंपनी BSNL नेटवर्क स्वस्तात मस्त प्लॅन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड भारतातील इतर मोठ्या कंपन्यांपेक्षा स्वस्तात अनेक प्रकारे सर्वोत्कृष्ट प्लॅन ऑफर करते. असाच एक स्वस्त रिचार्ज प्लॅन BSNL ने आणला आहे, जो फक्त 288 रुपयांमध्ये 60 दिवसांच्या वैधतेसह येतो. जाणून घेऊयात सर्व बेनिफिट्स-

BSNL चा 288 रुपयांचा प्लॅन

BSNL STV288 प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा एक प्रीपेड प्लान आहे, जो दोन महिन्यांच्या म्हणजेच संपूर्ण 60 दिवसांच्या वैधतेसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, 288 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर BSNL ग्राहकाच्या नंबरवर तब्बल 120GB डेटा मिळणार आहे. हा संपूर्ण डेटा तुम्हाला 4G डेटा स्पीडनुसार मिळणार आहे.

लक्षात घ्या की, 120GB डेटा तुम्हाला दैनिक मर्यादेसह वापरता येईल. त्यानुसार, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध असेल. होय, म्हणजेच वापरकर्ते या प्लॅनसह एका दिवसात जास्तीत जास्त 2GB पर्यंत डेटा वापरण्यास सक्षम असतील. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट डेटा स्पीड 40kbps च्या वेगाने सुरु राहील.

महत्त्वाचे

BSNL Prepaid Plan

महत्त्वाचे लक्षात घ्या की, BSNL STV288 हा एक ॲड ऑन पॅक आहे. या पॅकचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नंबरवर सर्वप्रथम काही बेस प्लॅन ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर, या ऍक्टिव्ह बेस प्लॅनची वैधता किमान 60 दिवस असणे अनिवार्य आहे. जर बेस प्लॅनची वैधता 60 दिवसांपूर्वी संपली तर या प्लॅनसह STV288 पॅकचा वापर देखील थांबणार आहे.

सध्या BSNL ने त्यांच्या 498 रुपये, 299 रुपये, 398 आणि 666 रुपयांच्या प्रत्येक रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 3GB मोफत डेटा ऑफर जाहीर केली आहे. ऑफर सविस्तरपणे बघण्यासाठी क्लिक करा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :