BSNL ने केली देशातील पहिल्या इंटरनेट टेलिफोनिक सेवेची सुरवात
चालू असलेली स्पर्धा पाहता BSNL ची बाजारातील हिस्सेदारी वाढवणे कौतुकास्पद आहे.
BSNL starts first internet telephony service in country: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांना दिली आहे एक खास भेट, BSNL यूजर्स साठी आनंदाची बातमी आहे कारण BSNL ने देशातील पहिली इंटरनेट टेलिफोन सेवा देण्याची घोषणा केली आहे. या मुळे यूजर्स विना सिम देशा-विदेशातील कोणत्याही नंबर वर कॉल करू शकतील आणि कॉल करण्याचा हा आता पर्यंतचे सर्वात सोप्पा आणि स्वस्त माध्यम असेल.
BSNL ने यासाठी एक मोबाइल अॅप 'विंग्स' लॉन्च केला आहे आणि या मोबाईल अॅप मधून ही सुविधा मिळेल जी तुम्ही वाई-फाई वरून वापरु शकता.
आता पर्यंत अॅप टू अॅप कॉलिंग ची सुविधा होती पण आता अॅप वरून मोबाईल नंबर वर कॉल करण्याची सुविधा देत आहे BSNL.
या सेवे साठी रजिस्ट्रेशन या आठवड्यात सुरू होईल आणि ही 25 जुलै पासून एक्टिवेट होईल. यासाठी फक्त 1,099 रुपये वार्षिक फी असेल ज्यात यूजर्सना अनलिमिटेड कॉल फॅसिलिटी मिळेल. त्यानंतर यूजर BSNL किंवा इतर कंपनी च्या वाई-फाई वरून देशात अमर्याद कॉल करता येतील.
हा अॅप BSNL ने जारी केलेल्या एका मोबाईल नंबर शी जोडला जाईल, पण कंपनी च्या ‘विंग्स’ अॅप यूजर्सना मोबाईल किंवा लँडलाईन कनेक्शन घेण्याची आवश्यकता नसेल. कंपनी च्या लँडलाईन ग्राहकांना एक वेगळाच फायदा होईल. त्यांना त्यांच्या कनेक्शन वर विना अॅप इनकमिंग कॉल येतील.
सध्यस्थिति पाहता BSNL चे हे स्मार्ट पाऊल देशाला अजून स्मार्ट बनवण्याच्या दृष्टीने एक कौतुकास्पद काम आहे.