BSNL आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्ससाठी ओळखली जाते. मात्र, सरकारी टेलिकॉम कंपनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या सध्याच्या प्लॅनचे फायदे कमी करत आहे. होय, काही काळापूर्वी कंपनीने 599 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये उपलब्ध नाईट डेटा फायदे काढून टाकले होते. मात्र, कंपनीने आता आपल्या ग्राहकांना खूश करण्याचा एक मार्ग शोधला आहे. आता BSNL ने त्यांच्या 699 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत अतिरिक्त वैधता देण्याची घोषणा केली आहे.
BSNL कंपनीने आपल्या 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचे फायदे बदलले आहेत. कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलद्वारे नवीन अपडेटची माहिती दिली आहे. नवीनतम अपडेटनंतर, कंपनीने प्लॅन अंतर्गत उपलब्ध वैधता वाढवली आहे.
यासह या प्लॅनमध्ये युजर्सना 130 दिवसांची वैधता देण्यात आली होती. मात्र, आता BSNL कंपनीने या प्लॅनमध्ये 20 दिवसांची अतिरिक्त वैधता देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, आता तुम्हाला BSNL च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 150 दिवसांची वैधता मिळेल.
BSNL च्या 699 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत अनेक अप्रतिम बेनिफिट्स मिळतात. हा कंपनीचा दीर्घकालीन वैधतेसह येणार प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना आता 130 दिवसांऐवजी 150 दिवसांची वैधता मिळेल. याशिवाय, हा प्लॅन यूजर्सना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ देतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये दररोज 0.5GB डेटा उपलब्ध आहे. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40 kbps कमी होतो. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 100 मोफत SMS ची सुविधाही मिळेल.