BSNL च्या 84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनमध्ये बदल, आता मिळेल डेली 3GB डेटा

BSNL च्या 84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनमध्ये बदल, आता मिळेल डेली 3GB डेटा
HIGHLIGHTS

दीर्घ वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्समध्ये बदल

BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन

पूर्वी या प्लॅनमध्ये डेली 5GB डेटा मिळत होता.

BSNL ने शांतपणे आपला लोकप्रिय प्लॅन बदलला आहे. BSNL चा नाईट अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन 599 रुपयांचा आहे. आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 5GB डेटा देण्यात येत होता. कंपनीने दैनिक डेटा मर्यादेत कपात केली आहे. मात्र, डेटा प्लॅनसोबत इतरही अनेक फायदे दिले जात आहेत. 

BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन 

 प्लॅनमध्ये एकूण 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा मिळणार आहे, मर्यादा संपवली तर इंटरनेट स्पीड 40Kbps पर्यंत कमी होईल. याशिवाय ग्राहकांना दररोज 100 SMS दिले जातात. तसेच रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अनलिमिटेड फ्री डेटा दिला जातो. 

काय बदल झाले ? 

टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत वाढवू शकतात, असा दावा काही काळापासून केला जात होता. मात्र,  BSNL ने रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केलेली नाही. पूर्वी या प्लॅनमध्ये डेली 5GB डेटा मिळत होता, आता तो कमी करून 3GB केला आहे. मात्र, नाईट अनलिमिटेड वैधता पूर्वीप्रमाणेच राहील. 

BSNLचा 197 रुपयांचा प्लॅन

भारत संचार निगम लिमिटेडच्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 40 Kbps पर्यंत जातो. या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS दिले जातात. मात्र, प्लॅनमधील सर्व फ्रीबीज केवळ 15 दिवसांसाठी आहेत. या प्लॅनची ​​वैधता 70 दिवसांची आहे. हा BSNL चा सर्वाधिक पसंत केलेला स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी BSNL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo