BSNL ने जियो ला टक्कर देण्यासाठी सादर केला नवीन 84 दिवसांचा प्लान

Updated on 01-Mar-2018
HIGHLIGHTS

BSNL च्या या नव्या प्लान ची किंमत Rs. 448 आहे आणि या अंतर्गत रोज 1GB डाटा सह अनलिमिटेड वॉइस कॉलिंग ची सुविधा पण मिळते.

जियो तर स्वस्त डाटा प्लान्स देण्यासाठी लोकप्रिय आहेच, पण आता BSNL पण कोणत्याही कंपनी पासून मागे राहिली नाही. BSNL ने बाजारात आपला एक नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान ची किंमत Rs. 448 आहे. 

या प्लान अंतर्गत BSNL यूजर्सना 84 दीवासांची वैधता मिळते. सोबत रोज 1GB डाटा मिळतो. या प्लान मध्ये रोज 100 SMS पण पाठवले जाऊ शकतात. तसेच हा प्लान अनलिमिटेड वॉइस कॉलिंग सह येतो. 
 
याच्या आधी BSNL ने 'KOOL' प्रीपेड रिचार्ज सादर केला होता, ज्याची किंमत Rs.1099 आहे. यामध्ये अनलिमिटेड डाटा मिळतो, यामध्ये रोज डाटा वापरण्यास कोणतीही मर्यादा नाही. या प्लान अंतर्गत अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्स पण केले जाऊ शकतात. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :