BSNL ने आपल्या या प्लान्स मध्ये केले मोठे बदल, आता मिळत आहे डबल डेटा पेक्षा पण जास्त

Updated on 06-Feb-2019
HIGHLIGHTS

BSNL ने आपल्या Rs 525 आणि Rs 725 मध्ये येणाऱ्या पोस्टपेड प्लान्स मध्ये काही मोठे बदल केले आहेत. इन बदलांमुळे आता तुम्हाला BSNL च्या या प्लान्स मध्ये दुप्पट डेटा पेक्षा पण जास्त सुविधा मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कि काय मिळत आहे BSNL च्या या दोन प्लान्स मध्ये बदलानंतर...

BSNL ने आपल्या दोन पोस्टपेड प्लान्स मध्ये बदल केले आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो कि कंपनीने Rs 525 आणि Rs 725 मध्ये येणाऱ्या दोन पोस्टपेड प्लान्स मध्ये BSNL ने काही बदल केले आहेत. जर काही दिवसांपूर्वी Rs 525 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये तुम्हाला BSNL कडून फक्त 15GB डेटा प्रति माह दिला जात होता. पण आता या प्लान मध्ये तुम्हाला 40GB डेटा मिळत आहे. तसेच जर Rs 725 मध्ये येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये आता तुम्हाला 50GB डेटा दिला जात आहे. तसेच वॉयस कॉलिंग आणि SMS चे लाभ पण तुम्हाला या प्लान्स मध्ये मिळत आहेत.

BSNL ने आपल्या प्लान्स मध्ये हे बदल करण्यामागचे कारण म्हणजे अनेक सर्कल्स मध्ये इतर टेलीकॉम कंपन्यां Rs 499 मध्ये येणाऱ्या प्लान 45GB डेटा प्रति माह ऑफर करत आहेत. याचा अर्थ असा कि आता पर्यंत Rs 525 आणि Rs 725 मध्ये येणाऱ्या BSNL च्या पोस्टपेड प्लान्स तुम्हाला कमी डेटा मिळत होता. BSNL कडे पण एक Rs 499 मध्ये येणार पोस्टपेड प्लान आहे जो काही सर्कल्स मध्ये मान्य आहे. जर उरलेल्या दोन प्लान्स बद्दल बोलायचे तर हे पॅन-इंडिया आधारावर भारतात लागू आहेत. त्याचप्रमाणे आता या प्लान्स मध्ये झालेले बदल पण पॅन-इंडिया आधारावर झाले आहेत.

BSNL Rs 525 आणि Rs 725 च्या किंमतीती येणारे पोस्टपेड प्लान्स

तुम्हाला तर माहितीच आहे कि BSNL कडे काही आकर्षक प्रीपेड प्लान आधीपासूनच आहेत आणि ते अजून चांगले व्हावेत म्हणून कंपनी अनेक प्लान कमी पण करत आहे. गेल्या काही काळात कंपनीने आपले प्लान्स जास्त चांगले करण्यासाठी अमेझॉन सोबत पण भागेदारी केली आहे. BSNL के Rs 525 मध्ये येणाऱ्या प्लान बद्द्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला आता 40GB डेटा ऑफर केला जात आहे, तसेच Rs 725 मध्ये येणारा प्लान पाहता या प्लान्स मध्ये आता तुम्हाला 50GB डेटा दिला जात आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :