BSNL ने आपल्या काई प्रीपेड प्लान्सना केले रिवाइज, आता मिळत आहे 25 पट असत डेटा
अलीकडेच BSNL ने त्यांचा Rs 666 चा प्रीपेड प्लान अपडेट केला होता
पण आता कंपनीने आपले तीन नवीन प्लान्स रिवाइज केले आहेत
या प्लान्स मध्ये Rs 35, Rs 53 आणि Rs 395 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लानचा समावेश आहे
अलीकडेच BSNL ने त्यांचा Rs 666 मध्ये येणारा प्रीपेड रिचार्ज प्लान अपडेट केला होता. तसेच कंपनीने दोन दीर्घ वैधता असलेले प्लान्स बंद केले आहेत. त्याचबरोबर कंपनी ने एक Rs 599 मध्ये येणारा प्लान पण लॉन्च केला आहे, जो 6 महिन्यांच्या वैधते सह येतो. पण आता कंपनीने एक नवीन डाव रचला आहे आणि यानुसार कंपनीने आपल्या इतर तीन प्रीपेड रिचार्ज प्लान्स मध्ये बदल केले आहेत आणि या बदलानंतर कंपनीच्या या प्लान्स मध्ये तुम्हाला 25 पट जास्त डेटा मिळत आहे. विशेष म्हणजे या प्लान्स मध्ये तुम्हाला Rs 35, Rs 53 आणि Rs 395 मध्ये येणारे प्रीपेड प्लान्स मिळणार आहेत.
जर Rs 35 मध्ये येणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला 5 दिवसांच्या वैधतेसह जवळपास 200MB डेटा मिळत आहे. पण आता या बदलानंतर तुम्हाला या प्लान मध्ये 5GB डेटा मिळणार आहे, पण याची वैधता 5 दिवसच असेल. विशेष म्हणजे या प्लान मध्ये तुम्हाला फक्त डेटा मिळत आहे, याव्यतिरिक्त तुम्हाला यात कॉलिंग आणि इतर काहीच मिळणार नाही.
आता जर Rs 53 मध्ये येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे तर या प्लान मध्ये तुम्हाला 250MB डेटा मिळत आहे, पण या प्लानची वैधता खूप जास्त आहे, या प्लान मध्ये तुम्हाला 21 दिवसांची वैधता मिळत आहे पण आता या बदलानंतर तुम्हाला या प्लान मध्ये जवळपास 8GB डेटा मिळत आहे सोबत आता वैधता या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये कमी करण्यात आली आहे, विशेष म्हणजे या प्लान मध्ये आता तुम्हाला 21 दिवसांच्या ऐवजी फक्त 14 दिवसांची वैधता मिळत आहे.
त्याचप्रमाणे असेच काही बदल कंपनीने आपल्या Rs 395 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान मध्ये पण केले आहेत. विशेष म्हणजे या प्लान मध्ये तुम्हाला आतापर्यंत FUP लिमिट सह 2GB डेटा दिला जात होता, तसेच डेटा लिमिट संपल्यावर याचा स्पीड 80Kbps होत होता. तसेच या प्लानची वैधता पण 71 दिवस होती. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला कॉलिंग पण मिळत होती. आता या प्लान मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.