Rs 100 च्या आत येणार्‍या या प्रीपेड प्लान्स मध्ये BSNL ने केले बदल

Updated on 10-Sep-2018
HIGHLIGHTS

BSNL ने आपल्या 7 प्रीपेड डाटा STV प्लान्स मध्ये बदल केले आहेत, हे सर्व प्लान्स Rs 100 च्या आत येतात, चला जाणून घेऊया या सर्व प्लान्स बद्दल.

BSNL ने अचानक कोणालाही न सांगता आपल्या काही प्रीपेड प्लान्स मध्ये बदल केले आहेत. कंपनी चे हे प्लान्स Rs 100 च्या आता येतात, जे आता तुम्हाला नवीन बेनिफीट्स सह मिळतील. विशेष म्हणजे BSNL कडे जवळपास 7 असे डेटा STV आहेत ज्यात मिळणारे बेनिफीट वाढवले आहेत. या प्लान्स मध्ये आता तुम्हाला जास्त डेटा आणि जास्त बेनिफिट मिळतील. Rs 57 मध्ये येणार्‍या प्लान बद्दल बोलायचे झाले तर, या प्लान मध्ये आता तुम्हाला 1GB डेटा 21 दिवसांसाठी मिळत आहे. त्याचप्रमाणे Rs 14, Rs 40, Rs 58, Rs 87, Rs 82, आणि Rs 85 वाल्या प्लान्स मध्ये पण बदल झाले आहेत. 

चला जाणून घेऊया या प्लान्स बद्दल 
STV 14: या प्लानची किंमत फक्त Rs 14 आहे, आणि आता या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डेटा एका दिवसाच्या वैधते सह मिळत आहे. या प्लान मध्ये आधी तुम्हाला 500MB डेटा मिळत होता आणि या आधी पण याची वैधता 1 दिवस होती. 

STV 40: BSNL च्या या प्लान मध्ये पण तुम्हाला 1GB डेटा मिळत आहे. पण या प्लान मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही, या प्लान मध्ये या आधी पण तुम्हाला 1GB डेटा मिळत होता आणि याची वैधता 5 दिवसांची आहे.  

STV 57: या प्लान बद्दल आपण वर बोललो आहोत, पण पुन्हा एकदा सांगतो की या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डेटा संपूर्ण 21 दिवसांसाठी मिळत आहे. 

STV 68, STV 78 आणि STV 82: या प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर पहिल्या प्लान मध्ये तुम्हाला 2GB डेटा 5 दिवसांसाठी मिळत आहे. तसेच 78 वाल्या प्लान मध्ये तुम्हाला 4GB डेटा मिळत आहे, पण या प्लान ची वैधता फक्त 3 दिवस आहे. त्याचप्रमाणे तिसर्‍या म्हणजे STV 82 बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला 4GB डेटा आणि PRBT मिळत आहे आणि या प्लानची वैधता 4 दिवसांची आहे. 

STV 85: या लिस्ट मध्ये शेवटचा प्लान हाच आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 5GB डेटा मिळत आहे, या प्लानच्या वैधते बद्दल बोलायचे झाले तर या प्लान ची वैधता 7 दिवसांची आहे. या सर्व प्लान्स मधील सर्वात चांगल्या प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर तो Rs 57 मध्ये येणारा 21 दिवसांच्या वैधता वाला प्लान आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :