BSNL ने आपल्या Rs 29 मध्ये येणार्‍या प्लान मध्ये केले मोठे बदल, आता मिळत आहे 1GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि खुप काही

BSNL ने आपल्या Rs 29 मध्ये येणार्‍या प्लान मध्ये केले मोठे बदल, आता मिळत आहे 1GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि खुप काही
HIGHLIGHTS

जवळपास एका महिन्यापुर्वी बीएसएनएल ने काही एंट्री-लेवल प्रीपेड रिचार्ज प्लान्स ची घोषणा केली होती. पण आता कंपनी ने आपल्या Rs 29 मध्ये येणार्‍या रिचार्ज प्लान मध्ये काही बदल केले आहेत आणि जे आता पर्यंत तुम्हाला या प्लान मध्ये मिळत होते, आता त्यापेक्षाही खुप कमी मिळत आहे.

तुम्हाला तर माहितीच आहे आता ऑगस्ट महिन्यात बीएसएनएल ने काही एंट्री-लेवल प्रीपेड रिचार्ज प्लान्स लॉन्च केले होते यात एक प्लान Rs 29 मध्ये तुम्हाला 2GB डेटा सोबत 100SMS आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देत होता. पण आता कंपनी ने या प्लान मध्ये मिळणारे सर्व फायदे कमी करत याला एक कमी सुविधा देणारा प्लान बनवला आहे. 

टेलीकॉमटॉक ची एक बातमी असे सांगते की बीएसएनएल ने आपल्या Rs 29 मध्ये येणार्‍या रिचार्ज प्लानच्या किंमतीत काही बदल न करता यात तुम्हाला याच्या संपूर्ण वैधते साठी फक्त 1GB डेटा देऊ केला आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग पण देण्यात येत आहे. या रिचार्ज प्लान मधील काही इतर फायदे पाहिले तर यात तुम्हाला जवळपास 7 दिवसांसाठी 100 SMS पण ऑफर केले जात आहेत. 

विशेष म्हणजे बीएसएनएल ने नुकताच एक निर्णय घेतला आहे, जो अशा प्रकारे आहे की आता पासून बीएसएनएल च्या काही पोस्टपेड रिचार्ज प्लान्स सोबत अमेजॉन प्राइम ची सदस्यता एका वर्षासाठी फ्री मध्ये मिळणार आहे. 

बीएसएनएल ने उचलेले एक मोठे पाऊल 
जर आपण टेलीकॉमटॉक चा एक रिपोर्ट पहिला तर त्यानुसार, बीएसएनएल च्या Rs 399 आणि त्या वर येणार्‍या पोस्टपेड रिचार्ज प्लान्स सोबत ते आता अमेजॉन प्राइम सेवेचे सब्सक्रिप्शन मोफत देणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही बीएसएनएल चे ब्रॉडबँड ग्राहक असाल तर तुम्हाला ही सेवा म्हणजे अमेजॉन प्राइम सेवा मिळवायची असेल तर Rs 745 किंवा त्या वरील प्लान्स ची निवड करावी लागेल. जर आपण एका वर्षाची अमेजॉन प्राइम सेवा विकत घेण्याचे ठरवले तर आपल्याला जवळपास Rs 999 मोजावे लागतात. पण बीएसएनएल आणि अमेजॉन ने ही सेवा एका वर्षासाठी आपल्या ग्राहकांना देता यावी म्हणून भागीदारी केली आहे. 

कशी मिळवाव ही सेवा
सर्वात आधी तुम्हाला पोस्टपेड प्लान ज्याची किंमत Rs 399 या किंवा त्यापेक्षा जास्त आहे, किंवा मग ब्रॉडबँड प्लान्स जे जवळपास Rs 745 किंवा त्या पेक्षा जास्त किंमतीत येतात त्यावर तुम्हाला अपग्रेड करावे लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला www.portal.bsnl.in वर जाऊन स्पेशल बीएसएनएल अमेजॉन ऑफर बॅनर वर क्लिक करावे लागेल. या बॅनर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा बीएसएनएल नंबर तिथे द्यावा लागेल. मग तुम्हाला एक OTP येईल, तो सबमिट केल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. तुम्हाला एक ‘एक्टिवेट’ पॉपअप स्क्रीन दिसेल. त्यानंतर तुम्ही अमेजॉन प्राइम सेवा सहज वापरू शकता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo