सरकारी प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणेजच BSNL आपल्या भारत फायबरच्या सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्सपैकी एक रिमूव्ह करणार आहे. लक्षात घ्या की, BSNL भारत फायबर ही भारतातील तिसरी सर्वात मोठी फायबर इंटरनेट सेवा प्रदाता (ISP) आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, BSNL आपल्या फायबर सेवेमधून सर्वात स्वस्त प्लॅन रिमूव्ह करणार आहे. होय, BSNL चा 329 रुपये प्रति महिना + 18% कर किंमतीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. हा प्लॅन 3 फेब्रुवारी 2024 पासून कंपनीच्या ऑफर लिस्टमधून रिमूव्ह करण्यात येणार आहे. हा प्लॅन सर्व सर्कल्समधून हटवण्यात येईल का? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र, सध्या हा प्लॅन बिहार सर्कलमधून हटवण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा: Vodafone Idea चा अनोखा प्रीपेड प्लॅन लाँच, तब्बल 13 OTT Apps चे सबस्क्रिप्शन मिळेल Free। Tech News
BSNL ने याआधी देखील त्यांचे काही जुने प्लॅन काढून टाकण्याची तारीख निश्चित केली होती. पण, त्या तारखेला कंपनीने त्यांची उपलब्धता आणखी काही महिन्यांसाठी वाढवली होती, म्हणजेच ते प्लॅन बंद करण्यात आले नव्हते. चला तर मग जाणून घेऊयात 329 रुपयांचा भारत फायबर प्लॅनचे बेनिफिट्स.
लक्षात घ्या की, हा प्लॅन सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये आधीपासूनच उपलब्ध नाही. तर, BSNL हा प्लॅन फक्त अशा राज्यांमध्ये ऑफर करते, जिथे ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे. अशा ठिकाणी कमी किमतीच्या ब्रॉडबँड प्लॅन्सची गरज आहे. BSNL च्या 329 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 20Mbps स्पीडसह 1TB किंवा 1000GB डेटा मिळतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये मोफत फिक्स्ड-लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शनसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचाही लाभ मिळतो. मात्र, लँडलाइन कनेक्शनसाठी, वापरकर्त्यास स्वतंत्रपणे डिव्हाइस खरेदी करावे लागेल. विशेषता, हे फायबर एंट्री प्लॅन्स राज्यातील फक्त ग्रामीण भागात किंवा अगदी लहान शहरांमध्ये उपलब्ध आहेत.