BSNL यूजर्सना धक्का! आता ‘या’ प्लॅनमध्ये Unlimited नाईट डेटा मिळणार नाही, जाणून घ्या किंमत। Tech News 

BSNL यूजर्सना धक्का! आता ‘या’ प्लॅनमध्ये Unlimited नाईट डेटा मिळणार नाही, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

BSNL च्या 599 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्स कमी करण्यात आले आहेत.

पूर्वी या प्लॅनमध्ये यूजर्सना रात्रभर अमर्यादित डेटाची सुविधा होती.

या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 3GB डेटाची सुविधा मिळते.

भारतातील सरकारी दूरसंचार कंपनी BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड कंपनी तिच्या स्वस्त प्रीपेड प्लॅन्ससाठी ओळखली जाते. BSNL कंपनी आपल्या ग्राहकांना कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त लाभ ऑफर करते. मात्र, यावेळी कंपनीने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या विद्यमान प्रीपेड प्लॅनमधील फायदे कमी केले आहेत. ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना यापुढे अनलिमिटेड नाईट डेटाची सुविधा मिळणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात या प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

हे सुद्धा वाचा: Airtel Xtreme Airfiber New Plans: कंपनीने सादर केले नवीन प्लॅन्स, मिळतील Unlimited बेनिफिट्स

BSNL Prepaid Plan
BSNL Prepaid Plan

BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन

आपण या रिपोर्टमध्ये BSNL च्या 599 रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती बघणार आहोत. लक्षात घ्या की, कंपनीने हा प्लॅन कोविड-19 दरम्यान लॉकडाऊन 2020 मध्ये लाँच केला होता. वापरकर्त्यांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त डेटा प्रदान करणे हाचा प्लॅनचा उद्देश आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दिवस आणि रात्रभर भरपूर डेटा सुविधा देण्यात आली आहे.

मात्र, आता सर्व परिस्थितीत परत सुरळीत झाली असताना वापरकर्त्यांच्या गरजा काळाबरोबर बदलल्या आहेत. आता वर्क फ्रॉम होम प्रणाली देखील हळू हळू कमी करण्यात येत आहे. त्यामुळे आता BSNL कंपनीने त्यांच्या 599 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत उपलब्ध असलेल्या फायद्यांमध्ये बदल केले आहेत. आता या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड नाईट डेटाची सुविधा मिळणार नाही. मात्र, नाईट डेटाशिवाय या प्लॅनचे फायदे पूर्वीप्रमाणेच असतील.

बेनिफिट्स

BSNL plan

प्लॅनमधील संपूर्ण बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची वैधता 84 दिवस म्हणजेच जवळपास तीन महिन्यांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 3GB डेटाची सुविधा मिळते. 84 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन तुम्हाला एकूण 252GB डेटा प्रदान करतो. डेली डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40kbps पर्यंत कमी होतो.

याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील आहे. त्याबरोबरच, या प्लॅनअंतर्गत यूजर्स दररोज 100 फ्री SMS पाठवू शकतात. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Zing, PRBT आणि Astrocell फायदे समाविष्ट आहेत. यापूर्वी, या प्लॅनसह कंपनी रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अमर्यादित नाईट डेटा देत होती. मात्र, आता हे बेनिफिट रिमूव्ह करण्यात आले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo