BSNL यूजर्सना झटका ! कंपनीने गुपचूप बंद केले ‘हे’ स्वस्त रिचार्ज, बघा यादी

BSNL यूजर्सना झटका ! कंपनीने गुपचूप बंद केले ‘हे’ स्वस्त रिचार्ज, बघा यादी
HIGHLIGHTS

BSNL ने चार स्पेशल टेरिफ व्हाउचर बंद केले.

कंपनीने STV71, STV104, STV135 आणि STV395 रिमूव्ह केले.

या सर्व प्लॅन्समध्ये अनेक प्रकारचे फायदे दिले जात होते.

भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने ग्राहकांना धक्का देत चार रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. चार सुपर-परवडणारे प्रीपेड रिचार्ज प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवरून एकाच वेळी काढण्यात आल्या आहेत. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा : खास टिप्सद्वारे 'अशा'प्रकारे बनवा Instagram reels, लगेच व्हाल फेमस…

 परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार BSNL STV – STV71, STV104, STV135 आणि STV395 16 फेब्रुवारी 2023 पासून काढून टाकण्यात आले आहेत. त्याच वेळी, कंपनीने आतापर्यंत कोणतेही नवीन STV अधिकृतपणे सादर केलेले नाहीत. बंद केलेल्या प्लॅन्सचे तपशील बघुयात… 

BSNL चे 71 रुपयांचे स्पेशल टेरिफ व्हाउचर

 पण, रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता समाविष्ट होती. वापरकर्त्यांना YAT 20 रुपये मिळत होते, ज्याचा वापर कॉलिंग आणि SMS पाठविण्यासाठी केला जाऊ शकतो.

BSNL चे 104 रुपयांचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर

या रिचार्जची वैधता 18 दिवसांची होती. तसेच, या रिचार्जमध्ये, 99 रुपयांचे विद्यमान प्लॅन फायदे आणि एक डिस्काउंट कूपन उपलब्ध होते.

BSNL चे 135 रुपयांचे स्पेशल टेरिफ व्हाउचर

या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 1440 व्हॉईस कॉलिंग मिनिटांचा लाभ देण्यात आला होता.

BSNL चे 395 रुपयांचे स्पेशल टेरिफ व्हाउचर

या प्लॅन अंतर्गत, वापरकर्त्यांना 71 दिवसांच्या वैधतेसह 3000 मिनिटे कॉल (ऑन-नेट) + 1800 मिनिटे ऑफ-नेट कॉल विनामूल्य मिळत होते. याशिवाय, फ्री कॉल मिनिटे संपल्यानंतर, वापरकर्ते 20 पैसे प्रति मिनिट दराने कॉल करू शकतात. तसेच, रिचार्जमध्ये दररोज 2GB डेटा मिळत होता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo