भारत संचार निगम लिमिटेड BSNL कडे 2GB डेली डेटा व्हाउचर आहे. आता जर तुम्हाला फक्त डेटा हवा असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त 2GB डेली डेटा दिला जातो. याशिवाय तुम्हाला या प्लॅनमध्ये फ्री SMS किंवा अमर्यादित कॉलिंगसारखे फायदे दिले जात नाहीत. ज्या मंडळांमध्ये BSNL त्याची 4G LTE सेवा ऑफर करत आहे, तेथे वापरकर्त्यांना या प्लॅनसह अधिक चांगल्या ऑफर आणि कनेक्शनचा अधिक वेग मिळत आहे.
हे सुद्धा वाचा : Xiaomi ची दिवाळी निमित्त जबरदस्त ऑफर ! स्वस्त स्मार्टफोन्सवर मिळेल सर्वात मोठी डील
मात्र, जे वापरकर्ते सध्या कंपनीच्या 3G कव्हरेज क्षेत्रात आहेत, ते देखील या प्लॅनसह रिचार्ज करू शकतात. हे एक डेटा व्हाउचर आहे. म्हणजेच हा प्लॅन तुमच्या फोनमध्ये आता सुरू असलेल्या प्लॅनसह खरेदी करून वापरला जाऊ शकतो. या रिचार्ज प्लॅनद्वारे, तुम्हाला अतिरिक्त डेटा अगदी सहज मिळेल. आता जर तुम्हाला वेगळा डेटा हवा असेल आणि तुम्हाला कॉल किंवा SMS चा मोह नसेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
BSNL चा 'Data_1515' व्हाउचर पूर्ण 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच फक्त एका रिचार्जने वर्षभराचा डेटा प्लॅनचे सारखं रिचार्ज करण्याचे टेन्शन तुम्हाला उरणार नाही. हा प्लॅन दररोज 2GB डेटासह येतो, याचा अर्थ असा की तो एकूण 730GB डेटा ऑफर करतो. हा डेटा संपल्यानंतर वेग कमी करून 40Kbps पर्यंत खाली येतो.
जर तुम्हाला BSNL च्या या 2GB दैनंदिन डेटा व्हाउचरने रिचार्ज करायचे असेल, तर तुम्हाला या प्लॅनच्या नावावरून त्याच्या किंमतीची कल्पना आलीच असेल. जर तुम्हाला हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी 1,515 रुपये खर्च करावे लागतील. ग्राहकांना या प्लॅनसह सर्व सर्कलमध्ये रिचार्ज करण्याचा पर्याय मिळेल. त्याबरोबरच, हा कंपनीने ऑफर केलेल्या सर्वात महागड्या प्लॅनपैकी एक आहे.