BSNL च्या आकर्षक प्लॅन्सने सर्वांना टाकले मागे, 13 महिने वैधतेसह मिळेल बरेच काही

Updated on 23-Feb-2023
HIGHLIGHTS

दीर्घकाळ वैधतेसह येणारे BSNL प्लॅन्स

या प्लॅन्सचा मासिक खर्च 300 रुपयांपेक्षा कमी

भरपूर डेटा, मोफत कॉलिंगसह बरेच बेनिफिट्स उपलब्ध

टेलिकॉम कंपनी BSNL अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करते. यापैकी काही प्लॅन दीर्घ वैधतेसह येतात. या प्लॅनमध्ये एक वर्षाची वैधता, फ्री डेटा आणि कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. या प्लॅन्सची मासिक किंमत रु.300 पेक्षा कमी आहे. म्हणजे BSNL च्या वार्षिक प्लॅन्सची मासिक किंमत Jio आणि Airtel च्या मासिक प्लॅनपेक्षा कमी आहे. बघुयात सविस्तर… 

हे सुद्धा वाचा: Lock Upp 2 : OTT वर येण्यास सज्ज, करण नाही तर 'ही' बिग बॉस विनर असेल जेलरच्या भूमिकेत ?

BSNL चा 2,999 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या प्लॅनमध्ये 395 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. हा प्लॅन दररोज 2GB डेटा मर्यादेसह येतो. तसेच 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 865GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 SMS सुविधा उपलब्ध आहे. तसेच, PRBT आणि Eros Now ची मासिक सदस्यता उपलब्ध आहे.

BSNL चा 2,399 रुपयांचा प्लॅन

हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच, दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मोफत दिली जात आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100SMS मिळतात. तसेच 74GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. याच्या मदतीने तुम्ही एकूण 802GB डेटाचा आनंद घेऊ शकता.

BSNL चा 1,198 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 3GB मासिक डेटा उपलब्ध आहे. त्याच कॉलिंगसाठी 300 मिनिटे आणि 30 SMS दिले जात आहेत. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :