BSNL : एका महिन्याच्या वैधतेसह येतात ‘हे’ स्वस्त प्लॅन्स, वाचा डिटेल्स

Updated on 28-Apr-2023
HIGHLIGHTS

BSNL चे डेली 1GB हाय-स्पीड डेटासह येणारे प्लॅन्स

हे प्लॅन्स 28 दिवसांच्या वैधतेसह येतात.

हे प्लॅन्स तुम्हाला 200 रुपयांअंतर्गत मिळतील.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL द्वारे बाजारात जवळपास प्रत्येक श्रेणीत वेगवेगळे प्लॅन ऑफर केले जातात. कंपनीकडे विविध किंमतीत प्रीपेड प्लॅन्सची विस्तृत श्रेणी आहे, जी 1GB डेली डेटा देखील ऑफर करते. BSNL द्वारे वेगवेगळ्या प्लॅनमध्ये 1GB दैनिक डेटासह 28 दिवसांची वैधता देखील दिली जाते. हे प्लॅन्स तुम्हाला 200 रुपयांअंतर्गत मिळतील. 

BSNL चा 184 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांची वैधता आणि BSNL कडून दररोज 1GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. याशिवाय, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील ऑफर केले जातात. प्लॅन BSNL Tunes आणि Lystn Podcast सेवा लाभांसह देखील येते.

BSNL चा 185 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला 1GB हाय-स्पीड डेटा मिळतो. हा प्लॅन सुद्धा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या देखील अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS ऑफर करतो. विशेष म्हणजे हा प्लॅन BSNL ट्यून्स आणि चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवेचाही लाभ देतो.

BSNL चा 186 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅनदेखील वरील प्लॅन्सप्रमाणे 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये तुम्हाला 1GB हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा तुम्हाला दररोज मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आणि दररोज 100 SMS चा लाभ देखील मिळेल. त्याबरोबरच, BSNL ट्यून्स आणि हार्डी गेम्समध्ये ऍक्सेस मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :