सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) वर्षभराच्या वैधतेसह अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर करते. तुम्ही 365 दिवसांच्या वैधतेसह स्वत:साठी नवीन योजना शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आजही BSNL खाजगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत खूप स्वस्त प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. 365 दिवसांच्या वैधतेसह BSNL प्रीपेड प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया…
हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसह लाँच होणार Realme 10, बघुयात संभावित किंमत
BSNL चा 797 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दररोज 2 GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच, यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. हाय स्पीड डेटा मर्यादा गाठल्यावर इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी केला जाऊ शकतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS दिले जातात. हा प्लॅन विनामूल्य 60 दिवसांची वैधता प्रदान करतो. हा प्लॅन मुंबई आणि दिल्ली वापरकर्त्यांसाठी आहे आणि एक एक्सटेंशन पॅक आहे.
BSNL चा 1,198 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दरमहा 3GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला दर महिन्याला 300 मिनिटे मिळतील. तसेच, यात दर महिन्याला 30 SMS दिले जातात.