BSNL : दररोज 5GB पर्यंत डेटा ऑफर करणारा सर्वात पावरफुल प्लॅन, दररोज 5 तास अमर्यादित डेटा
BSNLचे सर्वात पावरफूल प्लॅन्स
हे प्लॅन्स 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध
या प्लॅनमध्ये मिळेल पाच तास अमर्यादित डेटा
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL युजर्ससाठी अनेक उत्तम प्लॅन ऑफर करत आहे. तुम्ही दीर्घ वैधतेसह सर्वोत्तम प्लॅन्स शोधत असाल तरीही, BSNL तुम्हाला अनेक उत्तम पर्याय ऑफर करत आहे. येथे आम्ही तुम्हाला BSNL च्या टॉप 3 प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत आहेत. यामध्ये कंपनी दररोज 5GB पर्यंत डेटा देत आहे. एक असा प्लान देखील आहे ज्यामध्ये तुम्हाला दररोज 5 तास अमर्यादित डेटा देखील मिळेल.
हे सुद्धा वाचा : Brahmastra चित्रपट OTTवर रिलीज होण्यासाठी सज्ज, 'या' महिन्यात होणार रिलीज
BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन
BSNLचा हा प्लॅन 80 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 5 GB डेटा मिळेल. प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यामध्ये कंपनी दररोज 5 तास दुपारी 12 ते 5 वाजतापर्यंत अमर्यादित डेटा देत आहे. दररोज 100 मोफत SMS ऑफर करून हा प्लॅन देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील देतो. प्लॅनच्या सदस्यांना Zing चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
BSNL चा 499 रुपयांचा प्लॅन
80 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह येणारा, हा प्लॅन अनेक उत्तम फायदे देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळेल. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 40Kbps पर्यंत खाली येतो. कंपनी या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS देखील देत आहे. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला Zing मध्ये मोफत प्रवेश मिळेल.
BSNL चा 485 रुपयांचा प्लॅन
BSNL चा हा प्लॅन 82 दिवस चालतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लॅनमध्ये उपलब्ध स्पीड 40Kbps पर्यंत कमी होतो. इतर प्लॅन्सप्रमाणे, कंपनी दररोज 100 मोफत SMS सह अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे.
BSNL चे हे सर्व प्लॅन्स 3G आहेत. अशी अपेक्षा आहे की, 2023 मध्ये हे प्लॅन 4G स्पीड ऑफर करतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile