एकमेव भारतीय दूरसंचार कंपनी BSNL आपल्या स्वस्त आणि मस्त प्लॅन्ससाठी प्रसिद्ध आहे. BSNL कडे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत, जे कमी किमतीत येतात. आजकाल, बरेच लोक जे घरून ऑफिसमध्ये काम करतात, ऑनलाइन अभ्यास करतात किंवा OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहतात इत्यादींना अधिक डेटाची आवश्यकता असते. BSNL प्लॅन्स अमर्यादित व्हॉइस कॉलिंग तसेच भरपूर दैनंदिन डेटा आणि मोफत SMS सारखे अनेक फायदे देतात.
एवढेच नाही तर, BSNL प्लॅन्स दीर्घकालीन वैधता देखील ऑफर करतात. जर तुम्ही देखील BSNL वापरकर्ते असाल आणि असेच उपयुक्त प्लॅन शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आज आम्ही तुम्हाला एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जे कमी किमतीत 2GB डेली डेटासह येतात.
सरकारी टेलिकम प्रदाता BSNL आपल्या वापरकर्त्यांना 2GB दैनिक डेटासह अनेक प्लॅन्स ऑफर करते. मात्र, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, कंपनीच्या 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या श्रेणीत कंपनी दोन प्लॅन ऑफर करते, जे दररोज 2GB डेटा देतात. यामध्ये 197 आणि 199 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
BSNL चा हा प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, युजर्सला यात दररोज 2GB डेटा मिळतो. तसेच, या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 फ्री SMS मिळतात. हे फायदे पहिल्या 18 दिवसांसाठी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील. तर, वापरकर्ते वैधतेच्या उर्वरित दिवसांसाठी 40kbps च्या वेगाने डेटा वापरण्यास सक्षम असतील. हा प्लॅन त्यांच्यासाठी बेस्ट आहे, ज्यांना सिम सक्रिय ठेवायची आहे.
या यादीतील BSNL चा दुसरा प्लॅन 199 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना वरील पॅकप्रमाणे दररोज अमर्यादित कॉलिंग आणि मोफत SMS मिळतात. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा देखील मिळतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनची वैधता एक महिन्यासाठी म्हणजेच 30 दिवसांसाठी आहे. लक्षात घ्या की, युजर्स संपूर्ण 30 दिवसांसाठी प्लॅनमधील सर्व फायदे वापरण्यास सक्षम असतील.