रिलायन्स JIO, AIRTEL आणि VI अनेक परवडणारे प्लॅन्स देऊ शकतात, परंतु BSNL त्यांच्यासाठी नेहमीच कठीण स्पर्धा आहे. BSNL कडे असे अनेक स्वस्त प्रीपेड प्लॅन आहेत, जे इतर कोणत्याही कंपनीकडे नाहीत. येथे आम्ही तुम्हाला BSNL च्या 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत असलेल्या एका खास प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. जर तुम्ही परवडणारा दैनंदिन 2GB डेटा प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर BSNLचा हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.
हे सुद्धा वाचा : Netflix चा मोठा निर्णय ! मुलांचे चित्रपट आणि शो दरम्यान जाहिराती दाखवणार नाही
BSNL ग्राहकांना 187 रुपयांचा प्लॅन देत आहे. या प्लॅनची विशेषता म्हणजे यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यासह, वापरकर्त्यांना कंपनीकडून अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा देखील मिळते. BSNL ट्यूनचे एक बंडल देखील आहे आणि या सर्व मोफत सेवा ग्राहकांसाठी 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहेत.
BSNL 28 दिवसांच्या वैधतेसह आणखी एक प्लॅन ऑफर करते, ज्याची किंमत 185 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग व्हॉईस कॉल मिळतात. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये दररोज 1 GB हाय-स्पीड डेटा आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. BSNL या रिचार्ज प्लॅनवर मोफत पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (PRBT) देखील ऑफर करतो.