गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपले प्लॅन महाग केले होते. आता बऱ्याच काळानंतर सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने सुद्धा आपले काही प्लॅन महाग केले आहेत. BSNL ने 1,498 रुपयांच्या डेटा व्हाउचरची किंमत वाढवली आहे. ही थेट वाढ आहे, जी BSNL ने 1 जुलै 2022 पासून लागू केली आहे. या व्हाउचरची किंमत आता युजर्ससाठी 1,515 रुपये झाली आहे.
हे सुद्धा वाचा : नवीन फोन खरेदी करायचंय ? Samsungचे 2 मिड-रेंज फोन होणार लाँच, मिळतील जर्दास्त फीचर्स
या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे सारखेच असतील – दररोज 2GB डेटा दिल्यानंतर, स्पीड 40 Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. ही मोठी दरवाढ नसली तरी, BSNL त्यांच्या अनेक प्रीपेड प्लॅनचे फायदे कमी करत आहे. यापूर्वी कंपनीने 99 रुपये, 118 रुपये आणि 319 रुपयांचे फायदे कमी केले आहेत. पण, BSNL ने 999 आणि 1,499 रुपयांच्या प्लॅनचे फायदे देखील कमी केले आहेत. चला तर मग एकदा जुन्या आणि नवीन फायद्यांवर एक नजर टाकूयात…
BSNL चा 999 रुपयांचा प्लॅन पूर्वी 240 दिवसांच्या वैधतेसह येत होता. परंतु 1 जुलै 2022 पासून प्लॅनची वैधता 200 दिवसांची करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 200 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 2 महिन्यांसाठी मोफत PRBT ची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये कोणताही SMS किंवा डेटा लाभ उपलब्ध नाही.
BSNL चा 1,499 रुपयांचा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग + 100 SMS/दिवस + 24GB डेटासह येतो. यात बदल झालेला नाही, पण प्लॅनची वैधता आधीच्या 365 दिवसांवरून 336 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की प्लॅनचा दैनिक खर्च 4.10 रुपयांवरून 4.46 रुपयांपर्यंत वाढला आहे, जो खूप जास्त आहे.