खाजगी दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले होते. परंतु BSNL ने फक्त काही प्लॅन्स महाग केले होते. आता BSNL देखील प्लॅन बदलत आहे. खरं तर, कंपनी प्लॅनच्या किंमती वाढवत नाही तर त्यामध्ये उपलब्ध फायदे कमी करत आहे.
हे सुद्धा वाचा : लाँच होण्यापूर्वीच Redmi K60 ची भारतीय किंमत उघड, जाणून घ्या सर्व फीचर्स…
BSNL ने आपल्या तीन रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत, ज्यात रु. 269, रु. 499 आणि रु. 799 च्या प्लॅनचा समावेश आहे.
BSNL च्या या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर त्याची वैधता 28 दिवस आहे. प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 2GB डेटा, 100 SMS, BSNL Tunes, Eros Now सेवा आणि इतर फायदे मिळतात. पूर्वी हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येत होता.
या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. यामधील अतिरिक्त फायद्यांबद्दल सांगायचे तर, BSNL ट्यून, झिंग आणि गेमिंगचे फायदे प्लॅनमध्ये उपलब्ध असतील. प्लॅनची वैधता 75 दिवसांची आहे. यापूर्वी या प्लॅनची वैधता 90 दिवसांची होती तर डिसेंबरमध्ये कंपनीने त्याची वैधता 80 दिवसांपर्यंत कमी केली होती.
BSNL चा 769 रुपयांचा प्लॅन 2 GB डेटा प्रतिदिन, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन देते. प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळते. या रिचार्ज प्लॅनची वैधता आधी 90 दिवसांची होती, ती आता 84 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.