BSNL लवकरच 14 टेलिकॉम वर्तुळात आपली 4G सेवा सुरु करेल. ह्या वर्तुळात BSNL जवळ उदारीकृत व्यवस्थेअंतर्गत येणारा 20 मेगाहर्ट्ज ब्रॉडबँड वायरलेस एक्सेस (BWA) स्पेक्ट्रम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, BSNL जवळ 2500 मेगाहर्ट्ज बँडमध्ये 20 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम आहे. ह्याच्या माध्यमातून तो लायसेंससंबंधी कोणत्याही अडथळ्याशिवाय 4G सेवा सुरु करु शकतात. कंपनी चंदीगडमध्ये आपली 4G सर्विस आधीच सुरु केली आहे.BSNL 4G सर्विस सादर करण्यासाठी रेव्हेन्यूू शेअरिंग मॉडल आणि केपेक्स मॉडलची शक्यता तपासून पाहात आहे.
अलीकडेच भारती एयरटेल, वोडाफोन आणि आयडिया तसेच मोबाईल ऑपरेटिंग कंपन्या आपली 4G सेवा भारतात सुरु केली आहे. आणि लवकरच रिलायन्स जियोसुद्धा आपली 4G सेवा कमर्शियली लाँच करण्याच्या तयारित आहे.
हेदेखील वाचा – ओला ने आणली ऑटो कनेक्ट वायफाय सुविधा
हेदेखील वाचा – हिरेजडित असलेल्या सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचची किंमत आहे १० लाख रुपये