भारत संचार निगम लिमिटेड BSNL त्यांच्या ब्रॉडबँड प्लॅनसह मनोरंजन कंटेंट पाहू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी OTT बंडल ऑफर करत आहे. अशा प्लॅनच्या वापरकर्त्यांसाठी, 249 रुपयांमध्ये एक OTT बंडल उपलब्ध आहे, जो 9 वेगवेगळ्या OTT ऍप्समध्ये प्रवेश देईल. कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून भारतीय वापरकर्त्यांना OTT प्लॅटफॉर्मचे व्यसन लागले आहे. बहुतेक नवीन चित्रपट आणि टीव्ही शो या प्लॅटफॉर्मवर येतात.
हे सुद्धा वाचा : Tecno चा नवीन फोन 5000mAh बॅटरीसह भारतात लाँच, किंमत फक्त 6,999 रुपये
BSNL त्याच्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 9 OTT प्लॅटफॉर्म ऑफर करतो. ZEE5, SonyLIV, Voot Select, Yupp TV, aHa, Lionsgate Play, Hungama, आणि Disney+ Hotstar आणि आणखी एका ऍपसह या बंडलमध्ये 8 प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत.
ज्यांना OTT प्लॅटफॉर्मचे ऍक्सेस हवे आहे, अशा युजर्सना टेल्कोचा हा एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन खरेदी करता येईल. मात्र, लक्षात घ्या की हा मंथली सब्सक्रिप्शन प्लॅन आहे.
ही एकत्रित सेवा ग्राहकांना देण्यासाठी BSNL ने Yupptv Scope सोबत भागीदारी केली आहे. Yupp TV Scope ऍप iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
तुम्हाला एकाच लॉगिनसह एकाधिक प्लॅटफॉर्मवर कंटेंट पाहण्यास मिळेल. यामध्ये तुम्हाला सर्व प्लॅटफॉर्मसाठी वेगळे पैसे देण्याचीही गरज नाही, जी आजच्या काळात ग्राहकांसाठी मोठी समस्या आहे.
या प्लॅनची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, तुम्ही अनेक उपकरणांवर कंटेंट पाहू शकता. जसे की, टीव्ही, स्मार्टफोन, टॅबलेट किंवा संगणक इ. उपकरणांवर या प्लॅनसह तुम्हाला मनोरंजक कंटेंटचा लाभ घेता येईल.
BSNL चा एंट्री-लेव्हल प्लॅन सध्या 399 रुपयांचा आहे. या सरकारी टेलिकॉम कंपनीने अलीकडेच आपला 329 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन बंद केला आहे.