BSNL कडून 2,998 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर केला जात आहे. BSNL च्या या प्लॅनमध्ये 445 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. तर Jio आणि Airtel चे याच किंमत श्रेणीमध्ये येणारे प्लॅन्स 365 दिवसांच्या वैधतेसह येतात. चला तर बघुयात BSNLचाय या प्लॅनचे तपशील…
हे सुद्धा वाचा : OPPO Reno 8T 5G ची किंमत कमी, जाणून घ्या नवी किंमत आणि फीचर्स
या प्लॅनमध्ये 455 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटा दिला जातो. तसेच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 SMS दिले जातात. अधिक माहितीसाठी BSNL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या प्लॅनमध्ये जिओ वापरकर्त्यांना 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच दररोज 2.5 GB डेटा दिला जात आहे. अशा प्रकारे, या प्लॅनमध्ये एकूण 912 GB डेटा उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. हा प्लॅन एकूण 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय FASTag रिचार्जवर apollo सोबतच 100 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे.