दीर्घकाळासाठी सिम सक्रिय राहील, BSNL ने आणला सर्वात स्वस्त प्लॅन…

Updated on 30-Jan-2023
HIGHLIGHTS

सिम सक्रिय ठेवण्यासाठी BSNLचा स्वस्त प्लॅन

तुम्हाला प्लॅनमध्ये दरमहा 3GB डेटा आणि 300 SMS मिळतील.

या प्लॅनची संपूर्ण 365 दिवसांची आहे.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) भारतातील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी, आपल्या वापरकर्त्यांमध्ये स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीच्या स्वस्त प्लॅन्सचा लाभ घेण्यासाठी अनेक वापरकर्ते BSNL चे सिम अतिरिक्त सिम म्हणून वापरतात. कंपनीकडे स्वस्त किंमतीत येणारे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये त्यांचे सिम दीर्घ कालावधीसाठी सक्रिय राहते. जाणून घेऊयात BSNL च्या अशाच एका दीर्घकालीन प्लॅन्सबद्दल… 

हे सुद्धा वाचा : WHATSAPPवर चॅटिंग होणार मजेशीर, बदलता येईल टेक्स्ट बॅकग्राउंड आणि बरेच काही…

BSNL चा 1,198 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 1,198 रुपयांचा दीर्घकालीन रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 300 मिनिटांसाठी मोफत कॉल करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्हाला प्लॅनमध्ये दरमहा 3GB डेटा आणि 300 SMS ऑफर केले जात आहेत. हा प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग किंवा डेटा देत नाही, त्यामुळे हा प्लॅन खास अशा वापरकर्त्यांसाठी आहे, जे अतिरिक्त सिम म्हणून BSNL वापरतात. कॉलिंगसाठी मोफत मिनिटे देखील मासिक आधारावर दिली जात आहेत.

जर आपण BSNL च्या 1,198 रुपयांच्या प्लॅनमधील प्रत्येक महिन्याच्या खर्चाबद्दल बोललो तर त्याची मासिक किंमत फक्त 99 रुपये असेल. 99 रुपयांच्या मासिक खर्चासह, वापरकर्त्यांना 365 दिवसांसाठी सिम सक्रिय ठेवणे, मोफत कॉलिंग आणि  डेटा यासारखे फायदे मिळत आहेत, त्यामुळे तुमच्यासाठी हा एक चांगला प्लॅन ठरू शकतो. 1,198 रुपयांचा प्लॅन BSNL च्या यादीतील सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :