सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना कमी किमतीत अधिक डेटा देण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये Jio आणि Airtel आघाडीवर आहेत. पण दोघांनीही आपापल्या प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे BSNL आता अशी एक टेलिकॉम कंपनी आहे, जी ग्राहकांच्या बजेटमध्ये त्यांना अधिकाधिक बेनिफिट्स ऑफर करतेय. जर तुम्हाला कमी किमतीत जास्त डेटा हवा असेल, तर आम्ही तुम्हाला BSNL च्या 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत…
हे सुद्धा वाचा : Redmi A1+ बजेट स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर, मिळेल 5,000mAh बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा
BSNL चा 296 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे, ज्यामध्ये 60 दिवसांची संपूर्ण वैधता उपलब्ध आहे. वापरकर्त्यांना 60 दिवसांसाठी अनेक फायदे मिळतील. या प्लॅनमध्ये अधिक डेटा आणि बरेच फायदे उपलब्ध आहेत. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात या प्लॅनमधील रोमांचक फायदे…
BSNL चा 296 रुपयांचा प्लॅन अनेक उत्तम लाभांसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 120GB डेटा मिळेल. म्हणजेच प्लॅनमध्ये कोणतीही मर्यादा राहणार नाही. तुम्हाला सर्व डेटा एकत्र मिळेल. 120GB डेटा संपल्यानंतर, स्पीड 40kbps पर्यंत खाली येणार आहे.
याशिवाय, या प्लॅनमध्ये इतरही अनेक फायदे मिळतील. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 5 तास अमर्यादित इंटरनेट डेटा मिळेल. मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजतापर्यंत वापरकर्ते अमर्यादित डेटाचा आनंद लुटू शकतील. तसेच, यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS देखील मिळणार आहे.