BSNL कंपनी तिच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्ससाठी ओळखली जाते. कंपनी आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स सादर करते. यामध्ये, भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सारखे फायदे सर्वात कमी किमतीत मिळतात. जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल आणि दीर्घकालीन वैधतेसह येणार प्लॅन शोधत असाल तर, हा रिपोर्ट फक्त तुमच्यासाठी आहे.
या रिपोर्टद्वारे आम्ही तुम्हाला BSNL च्या दीर्घकालीन वैधता प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, जी तुम्हाला 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत दीर्घकालीन वैधता आणि डेटा, कॉलिंग आणि SMS लाभ देईल. या प्लॅनची किंमत आणि फीचर्सचे तपशील बघुयात-
हे सुद्धा वाचा: Vodafone Idea ची रिपब्लिक डे ऑफर! सवलतीसह मिळणार तब्बल 50GB डेटा Free, बघा Best ऑफर
सरकारी दूरसंचार कंपनी त्यांच्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये दीर्घ वैधतेसह स्वस्त रिचार्ज योजना आणते. 84 दिवसांपेक्षा कमी वैधतेसह येणार शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सना संपूर्ण 75 दिवसांची वैधता देत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात 499 रुपयांच्या प्लॅनमधील सर्व बेनिफिट्स.
बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, BSNL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटाची सुविधा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. तसेच, 75 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये तुम्ही लोकल आणि STD कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. डेटा आणि कॉलिंग व्यतिरिक्त, हा प्लॅन दररोज 100 SMS प्रदान करतो.
Airtel कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 499 रुपयांमध्ये केवळ 28 दिवसांची वैधता असलेला प्लॅन प्रदान करते. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS देखील पाठवू शकता. या प्लॅनमध्ये यूजर्सना Disney + Hotstar Mobile चे 3 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
तर, Jio कंपनीकडे 479 रुपयांमध्ये 56 दिवसांची वैधता असलेला प्लॅन ऑफर करते. यामध्ये दररोज 1.5GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये देखील दररोज 100SMS मिळतात.