90 दिवसांच्या वैधतेसह BSNL चा नवीन प्लॅन लाँच, किंमत 500 रुपयांपेक्षा कमी

Updated on 12-Jun-2023
HIGHLIGHTS

90 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह येणारे हे कॉलिंग व्हाउचर 439 रुपयांना येते.

यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल.

या पॅकमध्ये 300 मोफत एसएमएस देखील मिळतात.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आता आपल्या यूजर्ससाठी नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन जवळपास 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. ज्या ग्राहकांना डेटापेक्षा जास्त व्हॉईस कॉलिंग फायदे आवश्यक आहेत, त्या युजर्ससाठी हा प्लॅन सादर करण्यात आला आहे. म्हणजेच, हे BSNL चे एक स्वस्त व्हॉईस कॉलिंग व्हाउचर आहे, जे 90 दिवसांपर्यंत चालेल. या प्लॅन ची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. 

BSNL चा 439 रुपयांचा प्लॅन

 90 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह येणारे हे कॉलिंग व्हाउचर 439 रुपयांना येते. ज्या युजर्सना डेटा नको तर कॉलिंग बेनिफिट हवे आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयुक्त ठरेल. 

 बेनिफिटबद्दल बोलायचे झाल्यास, अर्थातच नावावरून कळले असेल की, यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. यामध्ये तुम्ही दररोज 90 दिवस लोकल एसटीडी कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. कॉलिंग व्यतिरिक्त या पॅकमध्ये 300 मोफत एसएमएस देखील मिळतात. 

लक्षात घ्या की, कॉलिंग आणि SMS व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये इतर कोणत्याही प्रकारचे फायदे समाविष्ट नाहीत. जर तुमच्या घरी वाय-फाय कनेक्टिव्हिटी असेल आणि फक्त नंबर ॲक्टिव ठेवण्यासाठी आणि कॉल करण्यासाठी स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर तुम्ही या प्लॅनसह जाऊ शकता. अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :