BSNL कंपनी स्वस्त रिचार्ज प्लॅन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या एका दीर्घकालीन वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये युजर्सना संपूर्ण एका वर्षाची वैधता मिळणार आहे. तसेच, यात वापरकर्त्यांना भरपूर डेटासह OTT फायदे देखील मिळतील. बघुयात किंमत आणि पैसावसूल बेनिफिट्स.
हा प्लॅन दीर्घकालीन वैधता म्हणजेच एका वर्षाच्या वैधतेसह येतो. जर तुम्हाला कमी किंमतीत दीर्घ वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर, हा प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना 600GB डेटा मिळणार आहे. 600GB डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा सँपेड 40 Kbps पर्यंत कमी होईल.
यासह, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील मिळणार आहे. तसेच, दररोज 100SMS चा लाभ देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. म्हणजेच, यामध्ये OTT फायदे देखील मिळत आहेत. या रिचार्जमध्ये तुम्हाला EROS NOW Entertainment च्या स्वरूपात OTT लाभ मिळेल. ही सुविधा 30 दिवसांसाठी वैध असेल.
Jio कंपनीकडे देखील असाच एक 2,879 रुपयांचा दीर्घकालीन वैधतेसह प्लॅन आहे. प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा लाभ उपलब्ध आहे. म्हणजेच, प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटाचा लाभ दिला जातो. याशिवाय, या प्लॅनचे फायदे वरील प्लॅनसारखेच आहेत.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग फायदे मिळतात. याव्यतिरिक्त, हा प्लॅन वापरकर्त्यांना 365 दिवसांच्या वैधतेसह 23 दिवसांची अतिरिक्त वैधता देतो.