आम्ही तुम्हाला भारत संचार निगम लिमिटेड BSNL च्या दीर्घकालीन प्लॅन्सबद्दल सांगत असतो. पण आज आम्ही तुम्हाला BSNL वापरकर्त्यांसाठी कंपनीच्या स्पेशल टेरिफ व्हाउचर 147 बद्दल माहिती देणार आहोत. या रिचार्जमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना सुमारे एक महिन्याच्या वैधतेसह डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ देते. सरकारी कंपनीचा या प्लॅनबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात –
BSNL च्या 147 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 30 दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना एकूण 10GB डेटा मिळतो, जो एकाच वेळी वापरता येईल. यामध्ये तुम्हाला काही मर्यादित डेटा मिळणार नाही. प्लॅनमध्ये डेटासोबत, अमर्यादित कॉलिंग तुम्हाला मिळणार आहे. मात्र यामध्ये तुम्हाला SMSचा लाभ मिळणार नाही. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात मोफत BSNL ट्यून उपलब्ध आहेत.
JIO कडे 149 रुपयांचा प्लॅन आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये 20 दिवसांसाठी एकूण 1GB इंटरनेट डेटा मिळतो. यात कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते. तर, AIRTEL कडे देखील 149 रुपयांचा प्लॅन आहे. ज्यामध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 1GB डेटा मिळतो आणि Airtel Xtreme ची मेम्बरशिप मिळेल.
वरील प्लॅन्ससमोर BSNL चा प्लॅन सर्वोत्तम आहे. मात्र, यात ग्राहकांना BSNL च्या नेटवर्कबाबत काही समस्यांना सामोरे जावे लागेल. कारण कंपनी अजूनही 3G सेवा देत आहे.