आता सर्व टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कमी किमतीत अप्रतिम बेनिफिट्स ऑफर करतात. मात्र, स्वस्तात मस्त प्लॅन देण्यासाठी अजूनही सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लोकप्रिय आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी किफायती प्लॅन्स आणत असते. भारत संचार निगम लिमिटेड एक वार्षिक योजना ऑफर करत आहे, ज्याची किंमत 1,198 रुपये आहे.
हा प्लॅन संपूर्ण बारा महिन्यांच्या म्हणजे वार्षिक वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये एकूण 3GB डेटा दिला जातो. तसेच, युजर्सना व्हॉईस कॉलिंगसाठी 300 मिनिटे मिळतात. यासोबतच आणि 30SMS ची सुविधा देखील दिली जात आहे. मात्र लक्षात घ्या की, कथित लाभ तुम्हाला महिन्याच्या महिन्याला मिळणार आहेत.
म्हणजेच तुम्हाला 12 महिन्यांच्या वैधतेदरम्यान दर महिन्याला 300 मिनिटे व्हॉइस कॉलिंग, 3GB डेटा आणि 30SMS दिले जातील. जर तुम्ही BSNL नंबर सेकंडरी फोन म्हणून वापरत असाल, तर हा प्लॅन किफायती ठरणार आहे.
जर आपण या प्लॅनच्या खर्चाबद्दल बोललो तर, या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. प्रत्येक महिन्याचा खर्च सुमारे 99 रुपये येईल. तसेच, दिवसाला सुमारे 3 रुपये खर्च येणार आहे. अशाप्रकारे, दर महिन्याला रिचार्ज करण्यापासून तुमची बचत होईल. जर तुम्ही एक महिन्याचे इतर प्लॅन्स पहिले तर, एका प्लॅनची किंमत जवळपास 200 रुपये येईल. त्या तुलनेत BSNL चा हा प्लॅन बराच किफायतशीर आहे.