अनेकदा आपण बघतो की, सणासुदीच्या काळात सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये अतिरिक्त डेटा लाभ जोडत असते. त्याचप्रमाणे, आता देखील BSNL चा सणासुदीचा हंगाम अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. खरं तर, कंपनी आपल्या काही रिचार्ज प्लॅन्समध्ये युजर्सना मोफत डेटा देत आहे. चला बघुयात कंपनी कोणत्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा मोफत देतेय.
हे सुद्धा वाचा: iQOO Neo 9 Pro Pre-Booking: आगामी स्मार्टफोनची प्री-बुकिंग आजपासून सुरु, Discountसह मिळेल 2 वर्षांची वॉरंटी। Tech News
कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. BSNL ने त्यांच्या 498 रुपये, 299 रुपये, 398 आणि 666 रुपयांच्या प्रत्येक रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 3GB मोफत डेटा ऑफर जाहीर केली आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना BSNL सेल्फ-केअर ॲप किंवा वेबसाइटद्वारे रिचार्ज करावे लागेल. चला तर मग बघुयात प्लॅन्समधील सर्व बेनिफिट्स-
BSNL चा हा प्लॅन अमर्यादित लोकल आणि STD व्हॉईस कॉल्स आणि 100 दैनिक SMS सह दररोज 3GB डेटा देत आहे. प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. वरील ऑफर BSNL च्या 299 रुपयांच्या डेटा व्हाउचरवरही लागू आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनी या प्लॅनमध्ये 3GB डेटा देत आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये वापरण्यासाठी एकूण 93GB डेटा उपलब्ध असेल.
398 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या BSNL वापरकर्त्यांना एकूण 120GB डेटा व्यतिरिक्त वरील ऑफर अंतर्गत 3GB मोफत डेटा दिला जात आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. वापरकर्त्यांना या वैधतेससह एकूण 123GB डेटा वापरता येईल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS देखील मिळतील.
499 रुपयांच्या प्लॅनची वैधता 75 दिवस आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल्स, दररोज 100SMS आणि दररोज 2GB डेटा मिळतो. ऑफर अंतर्गत, कंपनी प्लॅनमध्ये मोफत 3GB डेटा देत आहे. म्हणजेच एकूण डेटा वापरासाठी या प्लॅनमध्ये 153GB डेटा मिळेल. एवढेच नाही तर, BSNL ट्यून्स आणि Gameium Premium gaming चा लाभ देखील मिळणार आहे.
666 रुपयांच्या प्लॅनची वैधता 105 दिवस आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल्स, दररोज 100SMS आणि दररोज 2GB डेटा मिळतो. ऑफर अंतर्गत, कंपनी प्लॅनमध्ये मोफत 3GB डेटा देत आहे. एवढेच नाही तर, BSNL ट्यून्स आणि Astrotell & GameOn Servies चा लाभ देखील मिळणार आहे.