सरकारी मालकीची दूरसंचार सेवा प्रदाता भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या ग्राहकांना नेहमीच काही ना काही ऑफर देत असते. BSNL स्वस्तात मस्त बेनिफिट्स देण्यासाठी लोकप्रिय टेलिकॉम प्रदाता आहे. आता BSNL त्यांच्या ग्राहकांसाठी एका प्लॅनमध्ये अतिरिक्त वैधता ऑफर करत आहे. TelecomTalk मधील एका अहवालानुसार, BSNL त्याच्या 397 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर प्रमोशनल ऑफर म्हणून 30 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. या प्लॅनमध्ये काय ऑफर दिली जात आहे ते बघुयात.
BSNL चा 397 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सह येतो. याशिवाय या प्लॅनमध्ये 2GB अमर्यादित डेटाचा लाभ मिळतो. मात्र, हा डेटा कोटा संपल्यानंतरही इंटरनेट डेटाचा वेग 40kbps पर्यंत कमी होईल. यासोबतच या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये, सर्व फायदे 30 दिवस अधिक उपलब्ध आहेत, तर त्याची मानक वैधता 150 दिवसांची आहे.
397 रुपयांच्या 150 दिवसांच्या वैधतेसह येणारा हा प्लॅन प्रमोशनल ऑफरचा एक भाग म्हणून 30 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर करत आहे. या ऑफरनंतर प्लॅनची एकूण वैधता 180 दिवसांची होईल. रिपोर्टनुसार, ही प्रमोशनल ऑफर मर्यादित काळासाठीच वैध असणार आहे. 15 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान केलेल्या रिचार्जवर ही सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे या ऑफरचा लाभ गेहण्यासाठी युजर्सना घाई करावी लागेल. 397 रुपयांच्या प्लॅनची अतिरिक्त 30 दिवसांची वैधता ऑफर भारतातील अनेक प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे.
BSNL च्या 397 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आणखी 349 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्येही सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये 4G स्पीडसह दररोज 2GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना 40kbps च्या वेगाने अमर्यादित डेटा मिळतो.