सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या वापरकर्त्यांना 1200 रुपयांच्या लाभांसह फायबर ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करत आहे. BSNL भारत फायबरचे ब्रॉडबँड प्लॅन्स थेट Airtel एक्सस्ट्रीम फायबर आणि jio फायबर प्लॅन्सशी स्पर्धा करतात. आपला फायबर व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी, BSNL त्यांच्या विद्यमान लँडलाइन/DSL ब्रॉडबँड वापरकर्त्यांना फायबर सर्व्हिसवर स्विच केल्यास 1200 रुपयांचा लाभ देत आहे.
हे सुद्धा वाचा : 10,999 रुपयांना मिळतोय नवीन Samsung फोन, मिळेल 6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा
BSNL फायबर ब्रॉडबँड सेवेवर स्विच करणार्या वापरकर्त्यांना सहा महिन्यांपर्यंत प्रत्येक बिलवर 200 रुपयांची सूट देत आहे. म्हणजेच सहा महिन्यांत ग्राहकांना एकूण 1200 रुपयांची सूट मिळू शकते. ही सूट कंपनीने ऑफर केलेल्या प्रत्येक फायबर ब्रॉडबँड प्लॅनवर उपलब्ध असेल.
BSNL ची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी उपलब्ध असेल. BSNL कडे ओव्हर-द-टॉप (OTT) सबस्क्रिप्शनसह बंडल फायबर ब्रॉडबँड प्लॅन देखील आहे. वापरकर्ते 30 mbps ते 300 mbps स्पीड दरम्यान ऑफर करणाऱ्या प्लॅनमधून सिलेक्ट करू शकतात.
कंपनीने ऑफर केलेल्या कोणत्याही प्लॅनमध्ये 300 Mbps पेक्षा जास्त स्पीड देणारा प्लॅन नाही. ग्राहक त्यांच्या जवळच्या BSNL कार्यालयात किंवा कार्यालयात फोन कॉलद्वारे त्यांचे विद्यमान DSL/लँडलाइन कनेक्शन सहजपणे फायबर कनेक्शनमध्ये रूपांतरित करू शकतात. ऑफर आता लाईव्ह आहे, त्यामुळे प्रतीक्षा करू नका आणि त्याचा लाभ घेण्यासाठी ताबडतोब तुमच्या जवळच्या BSNL कार्यालयात कॉल करा.