BSNL ग्राहकांसाठी Good News! ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल 24GB अतिरिक्त डेटा Free, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
BSNL ने आपल्या ग्राहकांना एक खास भेट ऑफर केली आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनी आपला 24 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
24 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनी 24GB अतिरिक्त डेटाची सुविधा अगदी मोफत देत आहे.
एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांना एक खास भेट ऑफर केली आहे. खरं तर, सरकारी टेलिकॉम कंपनी आपला 24 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. विशेषतः यानिमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांना एक खास भेट देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत, निवडक रिचार्ज प्लॅनसह वापरकर्त्यांना तब्बल 24GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जाईल. BSNL कडे अनेक स्वस्त आणि उत्तम रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अप्रतिम ऑफर जाहीर केली आहे.
24GB अतिरिक्त डेटा ऑफर
BSNL India अधिकृत X (ट्विटर) हँडलवर एक पोस्ट शेअर करत नव्या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. “24 वर्षांचा विश्वास, सेवा आणि इनोव्हेशन.”, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. म्हणजेच या वर्षी कंपनीला 24 वर्षे पूर्ण होत असल्याची माहिती या पोस्टद्वारे देण्यात आली आहे. या शुभमुहूर्तावर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे. तुम्ही ही भेट खाली लिंकमध्ये पाहू शकता.
24 Years of Trust, Service, and Innovation!#BSNL has been #ConnectingIndia for 24 years, and we couldn’t have done it without you. Celebrate this milestone with us and enjoy 24 GB extra data on recharge vouchers over ₹500/-. #BSNLDay #BSNLLegacy #BSNLFoundationDay #BSNL pic.twitter.com/PpnHGe5G3S
— BSNL India (@BSNLCorporate) October 1, 2024
होय, कंपनीने जाहीर केले आहे की, 24 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनी 24GB अतिरिक्त डेटाची सुविधा अगदी मोफत देत आहे. ही ऑफर 500 रुपयांवरील रिचार्ज व्हाउचरवर उपलब्ध असेल. तुम्ही 500 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज केल्यास कंपनी तुम्हाला 24GB एक्सट्रा डेटा मोफत देणार आहे.
ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
महत्त्वाचे लक्षात घ्या की, BSNL च्या या ऑफरअंतर्गत उपलब्ध अतिरिक्त डेटाची वैधता 24 दिवसांची असणार आहे. तसेच, ही ऑफर देखील केवळ 24 दिवसांसाठी वैध असेल. 1 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान तुम्ही या ऑफरचा लाभ घेण्यास सक्षम असाल. त्यानंतर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.
थोडक्यात
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL गेल्या जुलै महिन्यापासून चर्चेत आहे. कारण, इतर खाजगी कंपन्यांनी जुलैमध्ये त्यांचे विद्यमान रिचार्ज प्लॅन्समध्ये दरवाढ केली आहे. त्यानंतर अनेक ग्राहक स्वस्त प्लॅन आणणारी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळू लागले. त्या कालावधीत देखील BSNL ने अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या होत्या. BSNL कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त आणि उत्तम रिचार्ज प्लॅन्स सादर करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile