भारतात एकमेव सरकारी कंपनी BSNL आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करते. प्लॅन्सची विशेषता म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला कमी किमतीत अनेक अप्रतिम फायदे मिळतात. एवढेच नाही तर, यासोबत कंपनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स जरी करत असते. दरम्यान, आता कंपनीने सध्याच्या 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह एक नवीन ऑफर सादर केली आहे.आम्ही तुम्हाला सांगतो की, या ऑफरअंतर्गत यूजर्सना आता अतिरिक्त डेटा फायदे मिळणार आहेत. जाणून घेऊयात तपशील-
BSNL कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणेजच पूर्वीच्या Twitter हँडलवर एका नवीन ऑफरची घोषणा केली आहे. BSNL सध्याच्या 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच कंपनीने 499 रुपयांच्या प्लॅनसह ही ऑफर सादर केली होती. या ऑफर अंतर्गत, कंपनी प्लॅनमधील वापरकर्त्यांना दैनिक डेटा व्यतिरिक्त अतिरिक्त 3GB डेटा लाभ देखील देत आहे. त्यानुसार, आता कंपनीने ही ऑफर 599 रुपयांच्या विद्यमान प्लॅनसह देखील सादर केली आहे. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.
599 रुपयांच्या प्लॅनच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा मिळतो. म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेनुसार प्लॅन तुम्हाला एकूण 252GB डेटामध्ये ऍक्सेस मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देखील घेऊ शकता. याद्वारे तुम्ही देशाच्या कोणत्याही ठिकाणी अखंडितपणे कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100SMS चा लाभ देखील मिळेल.
विशेश म्हणजे ऑफरअंतर्गत BSNL कंपनी आता या प्लॅनसह वापरकर्त्यांना अतिरिक्त 3GB डेटाचा लाभ आहे. त्यानुसार, हा प्लॅन तुम्हाला 255GB डेटाचा एक्सेस मिळेल. जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला कमी खर्चात अधिक डेटा लाभ मिळतील. लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त BSNL सेल्फकेअर ॲपद्वारे रिचार्ज केल्यावर उपलब्ध असेल.