BSNL आपल्या युजर्सना 4G सिम अपग्रेड अंतर्गत 2GB डेटा फ्री देत आहे, याआधी रिलायंस जियो कडून आपल्या सर्व युजर्सना 2GB डेटा फ्री देण्याची बातमी आली होती.
BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड बद्दल बोलायचे झाले तर या कंपनी कडे प्रत्येक सर्कल मध्ये 4G नेटवर्क नसल्यमुळे मागे राहते. पण कंपनी लवकरच सर्वां 4G नेटवर्क उपलब्ध करवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
नुकताच कंपनीला 2100MHz स्पेक्ट्रम पण अलोट झाला आहे, त्यानंतर कंपनी ने देशातील अनेक ठिकाणी आपलं 4G नेटवर्क स्थापित केले आहे. केरळ मधील इडुक्की जिल्ह्यात बीएसएनएल सक्रीय स्वरूपात हि सेवा उपलब्ध करत आहे. याव्यतिरिक्त एक नवीन अपडेट म्हणून गुजरात मध्ये पण 4G सेवेची टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे.
आता हि सेवा गुजरात मध्ये पण सुरु होणार आहे. विशेष म्हणजे गांधीधाम आणि गुजरातच्या अंजर कसब्यांमध्ये 4G 26 नोव्हेंबर 2018 ला सुरु पण करण्यात आला आहे. आता या जागी 3G चालणार नाही पण 2G अजूनही चालू आहे.
हे काम पूर्णपणे चालू करण्यासाठी कंपनी ने 2G/3G सिम 4G वर अपग्रेड करत आहे आणि म्हणून कंपनी आपल्या युजर्सना एक भेट पण देत आहे. त्यामुळे जो यूजर या अपग्रेड प्रोग्राम मध्ये सामील होत आहे त्याला 2GB डेटा फ्री मध्ये दिला जात आहे.
काही दिवसांपूर्वी आपण बघितले होते की रिलायंस जियो त्यांच्या जवळपास सर्वच युजर्सना 2GB डेटा फ्री मध्ये देत होती आणि त्यानंतर आता हि आकर्षक ऑफर बीएसएनएल पण आपल्या युजर्सना देत आहे.