BSNL चा नवीन धमाका; या रिचार्ज प्लान मध्ये मिळत आहे 6.1GB डेली डेटा

BSNL चा नवीन धमाका; या रिचार्ज प्लान मध्ये मिळत आहे  6.1GB डेली डेटा
HIGHLIGHTS

BSNL ने आपल्या वार्षिक Rs 2,099 मध्ये येणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये आता अपने यूजर्सना 6.1GB डेली डेटा ऑफर करण्याची घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी BSNL कडून एका बंपर ऑफरची घोषणा करण्यात आली होती, या ऑफर अंतर्गत बीएसएनएल ने आपल्या यूजर्सना त्यांच्या चालू प्लान वर अतिरिक्त 2.1GB डेली डेटा ऑफर केला जात होता. बीएसएनएल च्या या बंपर ऑफर मध्ये तुम्हाला काही दिवसांपूर्वीपर्यंत अतिरिक्त 2.2GB डेली डेटा तुम्हाला दिला जात होता, पण आता या ऑफर अंतर्गत तुम्हाला मात्र 2.1GB डेटा ऑफर केला जात आहे. 

दिवाळीच्या निमित्ताने या वर्षी बीएसएनएल ने आपले दोन प्रीपेड रिचार्ज प्लान Rs 1,699 आणि Rs 2,099 मध्ये लॉन्च केले होते, या दोन्ही प्लान्स मध्ये तुम्हाला क्रमश: Rs 2GB आणि 4GB डेली डेटा ऑफर केला जात होता, हा डेटा तुम्हाला या दोन्ही प्रीपेड प्लान्स मध्ये 365 दिवसांसाठी ऑफर केला जात होता. पण आता कंपनी ने आपल्या या प्लान मध्ये म्हणजे Rs 2,099 वाल्या प्रीपेड प्लान मध्ये आता तुम्हाला 6.1GB डेली डेटा देणार असल्याचे सांगितले आहे. 

बीएसएनएल ने आपल्या बंपर ऑफरचा अवधी जानेवारी 2019 पर्यंत वाढवली 

विशेष म्हणजे कंपनी ने हि ऑफर मानसून ऑफर म्हणून लॉन्च केली होती, यात तुम्हाला ते सर्व काही मिळत होते जे तुम्हाला या ऑफर मध्ये मिळत आहे. हा प्लान बघून असे म्हणू शकतो की इतर कोणत्याही कंपनीकडे म्हणजे एयरटेल, जियो, वोडाफोन इत्यादींकडे अशाप्रकारचा कोणताही प्लान नाही. यामुळेच इथे बीएसएनएल बाजी मारू शकते. पण जर आपण जियोच्या अशाच एखाद्या प्लान सोबत या प्लानची तुलना केली तर कदाचित बीएसएनएल चा हा प्लान फेल होऊ शकतो. कारण जियो फक्त तुम्हाला डेटा देत नाही तर इतर अनेक सुविधा पण ऑफर करते.
 

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo