आज आम्ही तुम्हाला Rs 300 मध्ये येणार्या काही प्लान्स मध्ये तुलना करून दाखवणार आहोत. त्याचबरोबर तुमच्यासाठी कोणत्या कंपनीचा प्लान योग्य आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काही काळापासून वोडाफोन आणि एयरटेल कडून एका वर्षासाठी आपल्या काही प्लान्स सोबत अमेजॉन प्राइम चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात होते. आता बीएसएनएल पण त्यांच्याच पाऊलांवर पाऊल टाकत आहे. टेलीकॉमटॉक च्या एका बातमी नुसार, बीएसएनएल पण आपल्या काही पोस्टपेड आणि ब्रॉडबँड रिचार्ज प्लान्स सोबत अशीच ऑफर देत आहे. याचा अर्थ असा की आता एयरटेल आणि वोडाफोन प्रमाणे बीएसएनएल चे काही निवडक पोस्टपेड आणि ब्रॉडबँड रिचार्ज प्लान्स सोबत तुम्हाला अमेजॉन प्राइम सेवेचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. ही घोषणा कंपनी ने आपल्या फार्मेशन डे च्या निमित्ताने केली. त्यानुसार 1 ऑक्टोबर म्हणजे आज पासून ही सेवा बीएसएनएल च्या काही निवडक पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लान्स सोबत मिळायला सुरवात होणार आहे.
बीएसएनएल ने उचलेले एक मोठे पाऊल
जर आपण टेलीकॉमटॉक चा एक रिपोर्ट पहिला तर त्यानुसार, बीएसएनएल च्या Rs 399 आणि त्या वर येणार्या पोस्टपेड रिचार्ज प्लान्स सोबत ते आता अमेजॉन प्राइम सेवेचे सब्सक्रिप्शन मोफत देणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही बीएसएनएल चे ब्रॉडबँड ग्राहक असाल तर तुम्हाला ही सेवा म्हणजे अमेजॉन प्राइम सेवा मिळवायची असेल तर Rs 745 किंवा त्या वरील प्लान्स ची निवड करावी लागेल. जर आपण एका वर्षाची अमेजॉन प्राइम सेवा विकत घेण्याचे ठरवले तर आपल्याला जवळपास Rs 999 मोजावे लागतात. पण बीएसएनएल आणि अमेजॉन ने ही सेवा एका वर्षासाठी आपल्या ग्राहकांना देता यावी म्हणून भागीदारी केली आहे.
कशी मिळवाव ही सेवा
सर्वात आधी तुम्हाला पोस्टपेड प्लान ज्याची किंमत Rs 399 या किंवा त्यापेक्षा जास्त आहे, किंवा मग ब्रॉडबँड प्लान्स जे जवळपास Rs 745 किंवा त्या पेक्षा जास्त किंमतीत येतात त्यावर तुम्हाला अपग्रेड करावे लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला www.portal.bsnl.in वर जाऊन स्पेशल बीएसएनएल अमेजॉन ऑफर बॅनर वर क्लिक करावे लागेल. या बॅनर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा बीएसएनएल नंबर तिथे द्यावा लागेल. मग तुम्हाला एक OTP येईल, तो सबमिट केल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. तुम्हाला एक ‘एक्टिवेट’ पॉपअप स्क्रीन दिसेल. त्यानंतर तुम्ही अमेजॉन प्राइम सेवा सहज वापरू शकता.