BSNL New Year Offer: 2025 हा नवीन वर्ष अखेर सुरु झाले आहे. या निमित्ताने अनेक कंपन्या निरनिराळ्या ऑफर्स जाहीर करत आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीने आपल्या विद्यमान वार्षिक रिचार्ज प्लॅनची वैधता वाढवली आहे. होय, BSNL प्लॅनमध्ये आधी 395 दिवसांची वैधता होती, ती आता त्याहून अधिक दिवसांसाठी वैध असणार आहे. तुम्ही BSNL चे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी ही ऑफर बेस्ट ठरेल.
प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी BSNL ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या Twitter हँडलद्वारे नवीन वर्षाच्या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी वापरकर्त्यांना 2,399 रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनसह दीर्घ वैधता ऑफर करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन 395 दिवसांच्या वैधतेसह येतो.
मात्र, न्यू इयर ऑफर अंतर्गत हा प्लॅन सक्रिय करून आता तुम्हाला तब्बल 425 दिवसांची वैधता मिळणार आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या की, ही ऑफर मर्यादित काळासाठी लाइव्ह करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्लॅन रिचार्ज करण्यासाठी घाई करावी लागणार आहे. या ऑफरचा लाभ केवळ 16 जानेवारी 2025 पर्यंतच मिळेल.
BSNL च्या 2,399 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटाचा लाभ मिळणार आहे. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40kbps पर्यंत कमी होईल. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधेचा समावेश आहे. तसेच, तुम्ही दररोज 100SMS चा लाभ देखील घेऊ शकता. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये काही कालावधीसा 425 दिवसांची वैधता मिळणार आहे. मात्र, त्यानंतर प्लॅनची वैधता केवळ 395 दिवस इतकी असेल.