BSNL New Year 2025 Offer: 60 दिवसांसाठी मिळेल दररोज 2GB डेटा, किंमत पाहून बसेल धक्का! Limited time deal
BSNL ने ग्राहकांसाठी नवीन वर्षानिमित्त जबरदस्त ऑफर सादर केली आहे.
BSNL ने 4G आणि 5G सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची तयारी तीव्र केली.
BSNL च्या नव्या प्लॅनमध्ये यूजरला 60 दिवसांची वैधता मिळेल.
BSNL New Year 2025 Offer: भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स आणत असते. दम्यान, कंपनीने आता BSNL ग्राहकांसाठी नवीन वर्षानिमित्त जबरदस्त ऑफर सादर केली आहे. 4G आणि 5G सेवा सुरू करण्याच्या जवळ येत असताना कंपनी नवीन प्लँन्स सादर करून नवीन ग्राहक जोडण्यात व्यस्त झाली आहे. पाहुयात नव्या प्लॅनची किंमत आणि सर्व ऑफर्स-
BSNL New Year 2025 Offer
सरकारी टेलिकॉम प्रदाता BSNL ने एक फेस्टिव्ह सीझन ऑफर आणली आहे. या प्लॅनमध्ये यूजरला 60 दिवसांची वैधता मिळेल. हा प्लॅन इंटरनेट वापरासाठी एकूण 120GB डेटा देतो. अर्थातच या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळणार आहे. डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी होईल. या नवीन प्लॅनची किंमत 277 रुपये इतकी आहे.
More data, more fun this festive season!
— BSNL India (@BSNLCorporate) December 26, 2024
Get 120GB for ₹277 with 60 days validity.
Offer valid till 16th Jan 2025. #BSNLIndia #FestiveOffer #StayConnected #Christmas #NewYear #LimitedTimeOffer pic.twitter.com/IwbjjPdShs
आम्ही तुम्हाला सांगतो, BSNL ने अधिकृत X वर पोस्ट करून माहिती शेअर केली आहे. ही ऑफर फक्त 16 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर, तुम्ही या प्लॅनसह रिचार्ज करू शकणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, टॅरिफ हाईकनंतर जेव्हा लोकांनी BSNL कडे वाळण्यास स्वारस्य दाखवले, तेव्हा BSNL ने 4G आणि 5G सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची तयारी तीव्र केली.
रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
BSNL ने 4G आणि 5G सर्व्हिस
अर्थातच BSNL च्या 4G आणि 5G सेवा 2025 मध्येच सुरू होतील”, असे TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे. यापूर्वी, भारताचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, BSNL येत्या मे 2025 पर्यंत एक लाख ठिकाणी 4G नेटवर्क सुरू करेल. यानंतर, लगेच जून 2025 मध्ये 5G नेटवर्क देखील सुरू होईल. TCS ने पुष्टी केली आहे की, BSNL ची 4G-5G सर्व्हिस वेळेवर सुरू होईल. प्लॅन्सनुसार काम सुरू असून सर्व काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल, अशी माहिती TCS ने दिली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile