भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी BSNL भारत संचार निगम लिमिटेडने अखेर भारतात Satellite-to-Device सुरू केली आहे. ही सर्व्हिस सुरु करणारी BSNL पहिली दूरसंचार कंपनी ठरली आहे. अलीकडेच कंपनीने IMC 2024 दरम्यान या नवीन सर्व्हिसची घोषणा केली होती. मात्र, अखेर कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी ही सर्व्हिस लाँच केली आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या सेवेसाठी BSNL ने कॅलिफोर्नियास्थित वायसॅट कंपनीसोबत भागीदारी केली आहे. नेटवर्क नसलेल्या भागात वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करणे, हाच या सेवेचा उद्देश आहे. चला तर मग फार वेळ न घालवता पाहुयात नव्या सर्व्हिसचे सर्व तपशील-
भारतीय दूरसंचार विभाग (Indian Department of Telecommunications DoT) ने त्यांच्या अधिकृत X हँडलवर जाहीर केले आहे की, BSNL ने भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस भारतात सुरू केली आहे. या सर्व्हिससह, BSNL ला वापरकर्त्यांना दुर्गम भागात आणि नेटवर्क नसलेल्या ठिकाणी नेटवर्क प्रदान करायचे आहे.
या सर्व्हिसची घोषणा करताना, DOT ने एक छोटा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये Satellite-to-Device सर्व्हिस ची झलक दाखवली आहे. तुम्ही वरील दिलेल्या लिंकमधील व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक प्रवासी डोंगराळ भागात ट्रेकिंग करत असताना अचानक त्याच्या फोनमधील नेटवर्क निघून गेल्याचे दिसत आहे. अशात, BSNL ची सॅटेलाइट-टू-डिव्हाइस सेवा प्रवाशांना मदत करते.
या सेवेद्वारे कोणीही त्याचे मित्र आणि कुटुंबीयांशी संपर्क साधू शकतो. ही सेवा तुम्हाला पर्वत, जंगल आणि दुर्गम भागात नेटवर्क उपलब्ध करून देईल. ही सेवा वापरण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसमध्ये सॅटेलाइट-टू-डिव्हाइस सपोर्ट असणे असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आज बहुतेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे फिचर प्रदान करत आहेत. उदा. Apple कंपनीने हे फीचर सर्वप्रथम iPhone 14 सीरीजसह बाजारात आणले होते.