भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 2,022 रुपये आहे. या प्रीपेड प्लॅनसह, कंपनी अशा लोकांना लक्ष्य करत आहे, ज्यांना दीर्घ कालावधीसाठी भरपूर डेटा असलेला प्लॅन हवा आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल सविस्तर…
हे सुद्धा वाचा : Ek Villain Returns : फ्लॉप होणार का चित्रपट ? बघा आतापर्यंत चित्रपटाने किती कमाई केली…
BSNL दरमहा 75GB डेटासह 2,022 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 300 दिवसांची सेवा वैधता, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळेल. दरमहा 75GB डेटा वापरल्यानंतर, वेग 40 Kbps पर्यंत घसरतो. मात्र, हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, डेटा फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी येतो. त्यानंतर, तुम्हाला डेटा हवा असल्यास, तुम्हाला डेटा व्हाउचरने रिचार्ज करावे लागेल.
हे एक मनोरंजक डेटा व्हाउचर आहे, जे BSNL ने 'आझादी का अमृत महोत्सव' PV_2022 च्या प्रस्तावानुसार लाँच केले आहे. ही ऑफर 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे, त्यामुळे तुम्हाला या व्हाउचरचा लाभ घ्यायचा असल्यास, या महिन्याच्या आत रिचार्ज करावे लागेल.
BSNL लवकरच 4G नेटवर्क लॉन्चिंगवर देखील काम करत आहे. यानंतर, BSNL वापरकर्त्यांना जबरदस्त 4G कव्हरेज आणि गती प्रदान करू शकतो.