सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 2 नवीन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅनसाठी प्रसिद्ध आहे. होय, आता कंपनीने आणखी दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही प्लॅन्सची किंमत 70 रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या दोन्ही प्लॅन्सची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
वर सांगितल्याप्रमाणे, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी 70 रुपयांपेक्षा कमी किमतीत 2 नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 58 आणि 59 रुपये इतकी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे कंपनीचे नवीन डेटा व्हाउचर प्लॅन्स आहेत.
कंपनीच्या 58 रुपयांच्या प्लॅनची वैधता एकूण 7 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटाची सुविधा मिळते. म्हणजेच 7 दिवसांच्या वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 14GB डेटाची सुविधा मिळेल. जर तुमची दैनंदिन डेटा मर्यादा संपली तर, इंटरनेटचा वेग 40Kbps इतका कमी होईल. या प्लॅनमध्ये डेटाशिवाय कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळणार नाही. यासाठी तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता असेल.
BSNL च्या 59 रुपयांच्या नवीन प्लॅनची वैधता देखील केवळ 7 दिवसांची आहे. परंतु, या प्लॅनमध्ये डेटा वापरासाठी तुम्हाला दररोज केवळ 1GB डेटा मिळेल. 7 दिवसांच्या वैधतेनुसार 59 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 7GB डेटा मिळेल. पण लक्षात घ्या की, अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
वरील दोन्ही प्लॅन्समध्ये यूजर्सला बेस प्लॅनसह रोजच्या अतिरिक्त डेटाची सुविधा मिळते. या व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅन्सचा वापर दुर्गम भागातही करता यईल. मात्र, त्या क्षेत्रात BSNL नेटवर्क उत्तमप्रकारे उपलब्ध असणे गरजेचे आहे. वरील दोन्ही प्लॅन तुम्हाला कमी किमतीत डेटा आणि कॉलिंगची सुविधा देतील.