सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणजेच BSNL अधिकाधिक युजर्सना आकर्षित करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नवनवीन प्लॅन्स सादर करत आहे. या मालिकेत सरकारी टेलिकॉम कंपनीने आणखी एक प्लान लाँच केला आहे. या पॅकमध्ये यूजर्सना 300GB पेक्षा जास्त डेटा आणि 100 दिवसांपेक्षा जास्त कालावधीची वैधता देण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हापासून खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केली, तेव्हापासून अनेक ग्राहक BSNL कडे वळले आहेत. त्यामुळे BSNL अनेक नवनवीन प्लॅन्स आणून अधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL च्या या नवीन प्लॅनची किंमत 997 रुपये आहे. या पॅकमध्ये 160 दिवसांची वैधता दिली जात आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा म्हणजेच एकूण 320GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 100SMS दिले जात आहेत. याव्यतिरिक्त, विना अडथडा कॉलिंग करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे.
BSNL प्लॅनमध्ये वरील बेनिफिट्सप्रमाणे केवळ कॉलिंग आणि डेटाच नाही तर गेमिंगची सुविधा देखील मिळणार आहे. यात हार्डी गेम्स, चॅलेंजर एरिना गेम्स आणि गेमियमचा ऍक्सेस विनामूल्य दिला जात आहे. याव्यतिरिक्त, वॉव एंटरटेनमेंट, झिंग म्युझिक आणि BSNL ट्यून्सचे सबस्क्रिप्शन देखील या पॅकमध्ये उपलब्ध आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, टेलिकॉम कंपनी BSNL ने या महिन्याच्या सुरुवातीला मान्सून डबल बोनान्झा ऑफर सादर केली होती. याअंतर्गत 499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आता हा प्लॅन तुम्हाला केवळ 399 रुपयांना खरेदी करता येईल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 60Mbps च्या स्पीडमध्ये 3300GB डेटा दिला जात आहे. जर वापरकर्त्यांनी त्यांचा डेटा वेळेपूर्वी संपवला तर त्यांना कमी स्पीडने डेटा प्रदान केला जाईल. एवढेच नाही तर, या ऑफर अंतर्गत नवीन सदस्यांना 1 महिन्यासाठी मोफत सेवा मिळेल.