BSNL ने रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देण्यासाठी आपला नवीन प्लान फक्त Rs 75 मध्ये लॉन्च केला आहे, या प्लान मध्ये कंपनी 10GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देत आहे.
भारतात वेगाने विकास करत असलेल्या काही खाजगी टेलीकॉम कंपन्या जसे की रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देण्यासाठी BSNL ने आपला नवीन फक्त Rs 75 मध्ये येणारा प्लान सादर केला आहे. अशा प्रकारच्या प्लानची किंमत खाजगी कंपन्या कडून Rs 100 ठेवण्यात आली आहे, पण BSNL ने खुप कमी किंमतीत असा प्लान लॉन्च केला आहे.
या नवीन प्लान मध्ये तुम्हाला 10GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग (ज्यात दिल्ली आणि मुंबई नाही) मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला यात 500 SMS पण मिळत आहेत. तसेच तुम्ही या प्लान ची वैधता पण तुमच्या गरजेनुसार वाढवू शकता. याची वैधता तुम्ही 90 दिवस किंवा 180 दिवसांसाठी वाढवू शकता.
या प्लान ची खरी वैधता पाहता ती जवळपास 15 दिवसांची आहे. तसेच यात तुम्हाला या वैधता साठी 10GB डेटा पण मिळत आहे. सोबतच तुम्हाला 500 SMS पण मिळत आहेत. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग पण मिळत आहे. ही तुम्ही लोकल, STD आणि रोमिंग इत्यादी साठी वापरू शकता, पण या कॉलिंग सुविधेत तुम्हाला दिल्ली आणि मुंबई मिळणार नाही.