BSNL ने रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देण्यासाठी आणले आपले जास्त सुविधा वाले स्वस्त प्लान्स

BSNL ने रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देण्यासाठी आणले आपले जास्त सुविधा वाले स्वस्त प्लान्स
HIGHLIGHTS

BSNL ने आता काही दिवसांपूर्वी देशातील काही भागांमध्ये आपली 4G सेवा लॉन्च केली आहे आणि यानंतर कंपनी ने नवीन प्लान सादर केले आहेत. BSNL ने आपला नवीन प्लान फक्त Rs 319 च्या किंमतीत लॉन्च केला आहे. चला जाणून घेऊया याबद्दल

जरी BSNL ने आपली 4G सेवा भारतात आणण्यास उशीर केला असला तरी नवीन प्लान्स बघून अस अजिबात वाटत नाही की कंपनी याबाबतीत कुठेही मागे आहे. सगळ्या टेलीकॉम कंपन्यांन प्रमाणे आपल्या नव नवीन प्लान्स ने यूजर्सना आकर्षित करण्यामध्ये BSNL पण मागे नाही. 
कंपनी ने आपले दोन नवीन प्लान बाजारात सादर केले आहेत. या दोन्ही प्लान ची मुख्य खूबी ही आहे की हे त्या यूजर्स साठी सादर करण्यात आले आहेत ज्यांना डाटा पेक्षा जास्त कॉलिंग आवडते आणि ज्यांना जास्त वेळ आपल्या प्रियजनांशी बोलण्याची सवय आहे. कंपनीने आपल्या हे दोन नवीन प्लान्स Rs 319 आणि Rs 99 च्या किंमतीत लॉन्च केले आहेत. 
कंपनी आपल्या या प्लान्स ने यूजर्सना लिमिट वीना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग चा एक्सपीरियंस देण्याचा प्रयत्न करत आहे. आता या नंतर आम्ही Rs 319 च्या किंमतीत येणार्‍या BSNL च्या नवीन प्लान बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला रोमिंग सह इतर कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग चा लाभ मिळत आहे. या पॅक मध्ये नॅशनल रोमिंग पण आहे. पण यात दिल्ली आणि मुंबई ठेवण्यात आली नाही. कंपनी ने आपल्या या दोन्ही सर्कल्स साठी वेगळे STV तयार केले आहेत. 
कंपनी ने Rs 319 वाल्या प्लान मध्ये तुम्हाला कोणतीही FUP लिमिट नाही याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही लिमिट विना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग चा फायदा घेऊ शकता. असेच काही एयरटेल आणि रिलायंस जियो च्या प्लान्स मध्ये पण तुम्हाला मिळते. या प्लान प्रमाणे Rs 99 वाल्या प्लान मध्ये पण तुम्हाला सुविधा मिळत आहेत, या दोन्ही प्लान्स बद्दल बोलायचे झाले तर यांची वैधता वेगवेगळी आहे. 
Rs 319 मध्ये येणार्‍या प्लान ची वैधता 90 दिवसांची आहे, तर Rs 99 मध्ये येणार्‍या प्लान ची वैधता फक्त 26 दिवस आहे. पण Rs 99 वाल्या प्लान सोबत तुम्हाला फ्री कॉलर ट्यून सेवा मिळत आहे आणि Rs 319 वाल्या प्लान सोबत कंपनी कोणतीही PRBT सेवा देत नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo