चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी चीनी कंपनी Xiaomi ला मोठी टक्कर देण्यासाठी भारतात आपला नवीन सब –ब्रांड आणला आहे, कंपनी ने आपल्या Realme सब-ब्रांड ची घोषणा केली आहे. हा ब्रांड ऑनलाइन ब्रांड च्या रुपात बाजारात आणण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनी ने याची घोषणा केली आहे की या ब्रांड अंतर्गत येणारे फोन्स कंपनी अमेजॉन इंडिया च्या माध्यमातून लॉन्च करणार आहे.
कंपनी ने याची घोषणा केली आहे की या ब्रांड अंतर्गत आपला पहिला फोन Realme 1 अमेजॉन इंडिया वरून 15 मे ला लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनी ने एक टीजर पण जारी केला आहे. या ब्रांड अंतर्गत देशात यूथला टारगेट करत डिवाइस सादर करण्यात येतील. त्याचबरोबर या ब्रांड मधील सर्व फोन्स भारतात निर्माण केले जातील.
आधी कंपनी ऑफलाइन बाजारावर लक्ष देत होती आणि आता या ब्रांड साठी कंपनी ऑनलाइन बाजार टारगेट करणार आहे. हा ब्रांड प्रामुख्याने Xiaomi ला प्रतिस्पर्धा देण्यासाठी सादर करण्यात येत आहे. आता Oppo ची ही ड्यूल ब्रांड रणनीति भारतात काशी चालेल ते सांगता येत नाही आणि या ब्रांड अंतर्गत कसे स्मार्टफोंस सादर केले जातील ही पण एक लक्ष देण्याची गोष्ट आहे.
कारण Huawei आपल्या Honor ब्रांड आणि Lenovo आपल्या मोटो ब्रांड अंतर्गत जास्त जास्त यूजर्स आपल्याकडे आकर्षित करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे ही योजना टीकेचा विषय ठरू शकते.
कंपनी ने हे पण सांगितले आहे की भारतात येताच जवळपास 500 ओप्पो सर्विस सेंटर्स चा वापर करून 90 टक्के क्लेम्स एक तासात सॉल्व करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच कंपनी ने हे पण सांगितले आहे की ती आपले हे स्मार्टफोंस प्रीमियम डिजाईन सह घेऊन येईल, तसेच हे स्मार्टफोंस 10 हजार पासून 20 हजार च्या किंमतीत लॉन्च केले जातील. कंपनी येणार्या काही दिवसांमध्ये या डिवाइस बद्दल माहिती देणार आहे.