एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने आपल्या यूजर्ससाठी नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त आणि परवडणारे प्लॅन्स आणते. त्यात आता नवे प्लॅन देखील समाविष्ट झाले आहे. कंपनीचा नवा प्लॅन दीर्घकालीन वैधतेसह सादर करण्यात आला आहे. या प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये यूजर्सना दीर्घ वैधतेसह डेटा आणि अनेक फायदे मिळत आहेत. जाणून घेऊयात नव्या प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
वर सांगितल्याप्रमाणे, BSNL ने 345 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, डेटा वापरासाठी कंपनी युजर्सना दररोन 1GB मोबाइल डेटा ऑफर करत आहे. डेटा संपल्यानंतर, मोबाइल डेटाचा वेग 40kbps पर्यंत कमी होईल. या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी आपल्या वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग सुविधा देते. याशिवाय, हा प्लॅन वापरकर्त्यांना दररोज 100SMS देखील देतो.
BSNL च्या या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना 60 दिवसांची वैधता म्हणजेच संपूर्ण दोन महिन्यांची वैधता मिळत आहे. हा प्लॅन त्या युजर्ससाठी योग्य आहे, ज्यांना परवडणाऱ्या किमतीत दीर्घ वैधता, मोफत SMS आणि कमी मोबाइल डेटा हवा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, BSNL ने 60 दिवसांच्या वैधतेसह कोणताही प्लॅन ऑफर केला नाही. अधिक माहितीसाठी BSNL च्या अधिकृत साईटला व्हिजिट करा. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
खाजगी टेलिकॉम कंपन्यानी जेव्हापासून दरवाढ केली आहे, तेव्हापासून वापरकर्ते स्वस्त BSNL प्लॅन्सकडे वळत आहेत. त्यामुळे, BSNL ने शक्य तितक्या लवकर देशभरात हाय-स्पीड नेटवर्क सेवा देणे, आवश्यक आहे. खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्सनी आधीच त्यांचे 4G नेटवर्क मजबूत केले आहे आणि आता ते 5G चे कव्हरेज मजबूत करत आहे. अशा परिस्थितीत, BSNL ला 4G आणि 5G च्या रोलआउटची स्पीड वाढवणे आवश्यक आहे.